ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Aditya Thackeray: पंतप्रधान दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर मोठा आरोप, म्हणाले...

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे फडणवीस म्हटले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात टक्केवारी ठरत नसल्यामुळे हे टेंडर काढण्यात आले नसल्याची टीका प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 19, 2023, 8:01 AM IST

Updated : Jan 19, 2023, 8:18 AM IST

पंतप्रधानांच्या मुंबईतील सभेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत. सायंकाळी मुंबईत त्यांची जाहीर सभा होणार आहे. सभेच्या जागेची तयारी आणि सुरक्षेचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला. त्यावेळी भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केले. मुंबईतील समुद्रातील पाणी गोड करण्याचा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षापासून पडून आहे. यामध्ये महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या पक्षाने कोणतीही पावले उचललेली नाहीत. अनेक पीपीटी प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काळात बंद पडले. त्यामुळे पीपीटी प्रकल्पावर आदित्य ठाकरे यांनी बोलू नये असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

टक्केवारी ठरत नव्हती म्हणून टेंडर काढले नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील चारशे किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी सहा हजार कोटींचे टेंडर काढले आहे. मात्र या कामांमध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र आमचे सरकार आल्यानंतर मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्याचे टेंडर काढले आहे. महाविकास आघाडीच्या काळात टक्केवारी ठरत नसल्यामुळे हे टेंडर काढण्यात आले नसल्याची टीका प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून महानगरपालिकेत भ्रष्टाचार जो सुरू आहे. तो संपवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याचाही उद्गगार यावेळी फडणवीस यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण मुंबई भर राज्य सरकारकडून जोरदार जाहिरात बाजी करण्यात आली आहे. तर तेथेच वांद्रे येथील बीकेसी संकुलमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. जवळपास लाखभर कार्यकर्ते आणि नागरिक या सभेत सहभागी होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथे सभेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बुधवारी घेतला. यावेळी सभेसाठी करण्यात आलेल्या संपूर्ण तयारीचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या सर्व सुरक्षेचा देखील आढावा फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.

हेही वाचा : PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मुंबईत! मेट्रोसह अनेक कामांचे करणार लोकार्पण; वाचा सविस्तर

Last Updated : Jan 19, 2023, 8:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.