ETV Bharat / state

Cabinet Expansion : खाते वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी?; उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीला रवाना - उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अकरा दिवस उलटूनही तिन्ही पक्षांतील मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे राज्यातील खातेवाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 12, 2023, 7:59 PM IST

Updated : Jul 12, 2023, 8:21 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्या नंतर अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची, तर आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, अकरा दिवस उलटूनही तिन्ही पक्षातील खाते वाटपाचा प्रश्न काही सुटलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

पक्ष श्रेष्ठीं सोबत करणार चर्चा : राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना, तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शिंदे यांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र, आत्ता ज्यांच्यावर आरोप केले, तोच पक्ष सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अजित पवारांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटचा विरोध : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील खातेवाटपाचा वाद मिटवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री बैठक झाली. शिंदे गटाचा अजित पवारांना विरोध असल्याने खातेवाटपाचा निर्णय लांबणीवर पडत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गट दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही असल्याचे समोर येत आहे.

दिल्लीत होणार फैसला : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. राज्यात खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पाटील हेही दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हेही दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

उद्या संध्याकाळी होणार निर्णय : यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तिन्ही पक्षांमध्ये अर्थ विभागाबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. खातेवाटपाबाबत उद्या सायंकाळ पर्यंत मंत्रिमंडळ निर्णय कळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार नसून शपथ घेतल्यानंतर वरिष्ठांची भेट घेणार असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच तिन्ही पक्ष एकत्र काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Balasaheb Thorat On CM : मंत्रिमंडळ खातेवाटपावरून बाळासाहेब थोरातांची शिंदेंवर टीका

Last Updated : Jul 12, 2023, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.