ETV Bharat / state

शिक्षकांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात करा, अन्यथा...- अनिल बोरनारे - Teacher Training

राज्यातील शिक्षकांकडून वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या नावाखाली शुल्क घेऊन तीन महिने उलटून गेले तरीही प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने शासनाकडून शिक्षकांना फसवले जात असल्याची टीका भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. प्रशिक्षणाचे तातडीने आयोजन न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही बोरनारे यांनी शिक्षण विभागाला केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 14, 2022, 5:09 PM IST

मुंबई - राज्यातील शिक्षकांकडून वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या नावाखाली शुल्क घेऊन तीन महिने उलटून गेले तरीही प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने शासनाकडून शिक्षकांना फसवले जात असल्याची टीका भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. प्रशिक्षणाचे तातडीने आयोजन न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही बोरनारे यांनी शिक्षण विभागाला केला आहे.

शैक्षणिक संस्कृतीला अशोभनीय - राज्यातील वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांची 23 डिसेंबरपर्यंत सशुल्क नोंदणी झाली असून तीन महिने होत आले तरी, प्रशिक्षण सूरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांचे प्रशिक्षणाकरिता 22 नोव्हेंबर, 2021 च्या संचालनालयाच्या परीपत्रकान्वये महाराष्ट्रातील हजारो पात्र शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेली होती. प्रशिक्षणासाठी इतिहासात पहिल्यांदाच शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क घेण्यात आलेले आहे. ही बाब महाराष्ट्राच्या शैक्षणिक संस्कृतीला अशोभनीय असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला.

आंदोलनाचा इशारा - ज्याअर्थी महाराष्ट्रातील पात्र शिक्षकांची वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी सशुल्क नोंदणी झालेली असताना अद्यापही प्रशिक्षणाचा अधिकृत कार्यक्रम तारखांसह निश्चित करण्यात आलेला नाही. शुल्क भरूनही प्रशिक्षणास अतिशय विलंब होणे ही बाब शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवर संशय निर्माण करणारी आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या तारखा घोषित करून प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुरुवात करावी अन्यथा नाईलाजास्तव भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिल बोरनारे यांनी शासनाला दिला आहे.

हेही वाचा - Heatwave In Maharashtra : मुंबईसह राज्यातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.