मुंबई : ठाणे ते भिवंडी या मार्गाकडे पाहिजे तसे लक्ष दिले गेले ( Depot Problem to be Solved For Metro Route 5 ) नव्हते. मात्र, आता या मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर ( 70 Percent Work of First Phase ) आहे. मेट्रो मार्ग ५ ठाणे-भिवंडी-कल्याण या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडीदरम्यान १२.७ किमीचा पहिला टप्पा प्रगतिपथावर ( Thane to Bhiwandi Metro Route 5 completed ) असून, यामध्ये एकूण ६ पूर्णतः उन्नत स्थानके असणार आहेत. मार्गिकेच्या या टप्प्यातील स्थानकांची ६४ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली असून, एकूण ७० टक्के इतकी भौतिक प्रगती साध्य करण्यात आली आहे. या मार्गासंदर्भात डेपोचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे.
कशेळी खाडीवर मेट्रो मर्गिकेची स्थिती, सुमारे ५० टक्के काम पूर्ण मेट्रो मार्ग ५ च्या मार्गात कशेळी येथे ५५० मीटर लांबीची खाडी आहे. जिच्यावर मेट्रोचा पूल उभरण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकूण १३ स्पॅन उभारण्यात येणार असून, सद्य:स्थितीत ८ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. या प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे ४२ मी. इतकी असेल. मेट्रो मर्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी मेट्रो ४ व ५ चे एकत्रिकृत स्थानक बाळकुमनाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा व धामणकरनाका भिवंडी या स्थानकांचा समावेश आहे.
मेट्रो मार्गिका ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडीदरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरणपूरक व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच, उपनगरीय रेल्वे, बेस्ट/ टीएमसी बससेवा यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी होण्यास मदत होईल. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यावर प्रवासाच्या वेळेत साधारणतः २० मिनिटांची बचत होईल.
जनतेला परवडणारे तिकिटाचे दरही असावे मेट्रो मार्गीका पाच तयार झाल्यास ठाणे ते भिवंडी सध्या रस्त्याने जाण्यासाठी प्रचंड वेळ लागतो तो कमी होईल. कारण रस्ते अत्यंत जुने झालेले आहेत. रस्त्यांमध्ये खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहे असा प्रश्न पडावा अशी या मार्गाची स्थिती आहे; मात्र या मेट्रोचे तिकीट दर जनतेच्या आवाक्यात असले पाहिजे अशी देखील या भागातील जनतेची मागणी आहे.
मेट्रो मार्गिका ५ साठी कशेळी येथे सेंट्रलाइज्ड डेपोसाठी जागा निश्चित भूसंपादन आणि निविदा प्रक्रियाचे काम प्रगतीपथावर आहे. या मर्गिकेतील अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रिज करिता स्पेशल स्टील गर्डर स्पॅन बसवण्यात येणार आहेत, ज्याचे काम लवकरच सुरू होईल". अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.