ETV Bharat / state

Cesarean Delivery Hike : राज्यात सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढले; आरोग्य विभागाची चिंता वाढली

सध्या महाराष्ट्रात सिझेरियन प्रसुतीच्या (cesarean delivery cases in maharashtra) प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सिझेरियन प्रसूतीच्या वाढत्या प्रकरणांमुळे ( increasing cases of cesarean delivery ) आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. याबाबत राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने ( Department of Family Welfare ) १६ डिसेंबर रोजी FOGSI ला पत्र पाठवले आहे. सिझेरियन प्रसूतीबाबत समिती स्थापन करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Family Welfare
सिझेरियन प्रसूतीचे वाढते प्रमाण
author img

By

Published : Dec 25, 2022, 8:00 AM IST

Updated : Dec 25, 2022, 9:08 PM IST

डॉक्टर रुपेश वडगावकर, स्त्री रोग तज्ञ

मुंबई : राज्यात सिझेरियन प्रसूतीच्या ( Cesarean delivery ) वाढत्या संख्येवर आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. याबाबत, आरोग्य विभागाने पुन्हा एकदा 'द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI)' ला पत्र पाठवून ( Department of Family Welfare Sent letter ) आपल्या सदस्यांना रॉबसनच्या सुधारित निकषांचे पालन करण्याची आठवण (cesarean delivery cases in maharashtra) करून दिली आहे. यापूर्वी २०१७ मध्येही आरोग्य विभागाने 'एफओजीएसआय'ला वाढत्या सिझेरियन प्रसूतीबाबत माहिती दिली होती. ( increasing cases of cesarean delivery)

३५ टक्के प्रसूती सिझेरियनने : विवाहित महिलेला आई होणे ही खूप आनंदाची बाब आहे. परंतु प्रसूती वेदनांची भीती, डॉक्टरांची सुस्त वृत्ती, रुग्णालयातील मर्यादित मनुष्यबळ आणि मुहूर्तावर आधारित प्रसूती (निश्चित कालावधी) इत्यादी सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, खाजगी रुग्णालयांमध्ये २०१७-१८ या वर्षात ७,८८,८८२ प्रसूती झाल्या, त्यापैकी १,८८,९६३ म्हणजेच २४ टक्के प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाल्या. तर ऑक्टोबर २०२२ पर्यंत ५,००,४६१ प्रसूती खाजगी रुग्णालयांमध्ये झाल्या, त्यापैकी १,७६,१२६ म्हणजेच ३५ टक्के प्रसूती सिझेरियनने झाल्या. गेल्या ४ वर्षांत सिझेरियन प्रसूतीमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सिझेरियन प्रसूतीच्या वाढत्या प्रकरणांमुळे ( increasing cases of cesarean delivery ) आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. याबाबत राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने ( Department of Family Welfare ) १६ डिसेंबर रोजी FOGSI ला पत्र पाठवले आहे.

विषय अत्यंत संवेदनशील : सिझेरियन प्रसूतीबाबत समिती स्थापन करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या समितीमध्ये सुधारित रॉबसन निकष लागू ( Apply Robson criteria ) करण्याचे सांगण्यात आले. सोबतच या प्रोटोकॉलची माहिती FOGSI च्या माध्यमातून खासगी रुग्णालये आणि खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांपर्यंत पोहोचवण्यासही सांगण्यात आले. यानंतरही सिझेरियन प्रसूतीच्या आकडेवारीत कोणतीही घट झाली नसली तरी हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने आरोग्य विभागाने पुन्हा एकदा FOGSI ला सिझेरियन प्रसूतीशी संबंधित निकषांची माहिती दिली आहे. या निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी खासगी रुग्णालये आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना मार्गदर्शक ( Gynecologist guidance ) सूचना जारी करण्याचे आवाहनही पत्रात करण्यात आले आहे. या संदर्भात FOGSI शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अशा परिस्थितीत बोर्ड बैठक घेते आणि नंतर सर्वांना संदेश दिला जातो. बैठकीत, सदस्यांना सरकारने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन करावे आणि सिझेरियन प्रसूतीची संख्या कमी करण्यासाठी नियम आणि आवश्यक धोरणे अवलंबण्याची सूचना देण्यात आली आहे.

numbers
आकडेवारी

अधिक कमाईसाठी सिझेरियन ? डॉक्टर रुपेश वडगावकर यांच्या म्हणण्यानुसार सिझेरियन साठी अनेक कारणे आहेत व काही कारणे ही परिस्थितीनुसार उद्भवल्यामुळे त्या पद्धतीने त्याविषयी त्यादरम्यान सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो. जेजे रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ.अशोक आनंद यांनी सांगितले की, सिझेरियनचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत. हल्लीच्या स्त्रिया बाळंतपणाचा त्रास सहन करू इच्छित नाहीत आणि डॉक्टरांकडे सिझेरियन करण्याचा आग्रह धरतात. तसेच, प्रसूती लवकर व्हावी, अशा अनेक मागण्या आहेत, जे सिझेरियनद्वारेच शक्य आहे. याशिवाय अनेक रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूतीमध्ये रुग्णाला पाहण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने वेळ लागतो, तर सिझेरियन १ किंवा २ तासांत होते. काही रुग्णालये अधिक कमाईसाठी असे करतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे, मात्र ही प्रथा तातडीने बंद करावी, तरच सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण कमी होईल.

Last Updated : Dec 25, 2022, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.