ETV Bharat / state

मुंबईत ६०६ ठिकाणी आढळले मलेरिया, तर ३१०२ ठिकाणी डेंग्यूचे डास

मुंबईसह राज्यभरात सध्या पार्‍याने चाळीशी पार केल्याने वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे विविध साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचा धोका वाढताना दिसतो आहे. स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच-१, एन-१’ विषाणूच्या संसर्ग झाल्याचे १४ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.

मुंबईत आढळले मलेरिया आणि डेंग्यूचे डास
author img

By

Published : May 2, 2019, 11:53 AM IST

मुंबई - साथींचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे मुंबईकर मात्र स्वत:च्या घरातच डेंग्यू, मलेरिया पोसत असल्याचे समोर आले आहे. मागील ३ महिन्यांत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने तपासणी केली. इमारती, घरे आणि डास उत्पत्तींच्या सुमारे ४ लाखांहून अधिक ठिकाणी तपासणी केली असून यात ६०६ ठिकाणी मलेरिया, ३१०२ ठिकाणी डेंग्यू तर २७२४ ठिकाणी दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. पालिकेने या सर्वाना नोटीस बजावली असून प्रत्येक दिवशी ३० जणांना नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत आढळले मलेरिया आणि डेंग्यूचे डास

साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत पालिकेकडून वर्षभर जनजागृती केली जाते. शिवाय धुम्र फवारणी, डास-उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू असते. अस्वच्छता आणि पाणी साठून राहणार्‍या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे ही ठिकाणे नष्ट केली जात आहेत. पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे या कामाचा वेग आणखी वाढला आहे. जानेवारीपासून केलेल्या या तपासणी आणि कारवाई मोहिमेत मुंबईकरांचा याबाबत निष्काळजीपणा समोर येत आहे. या तपासणीत ६०६ ठिकाणी मलेरिया पसरवणारे एनॉफिलीज स्टिफेन्सी डासांच्या अळ्या, ३१०२ ठिकाणी डेंग्यू पसरवणारा एडिस इजिप्तीच्या तर २७२४ ठिकाणी दोन्ही आजार पसरवणारे डास आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी डास उत्पन्न होणार नाहीत, अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

दंडात्मक कारवाई होणार -
डेंग्यू-मलेरिया उत्पन्न करणारे ठिकाणे आढळल्यास पालिकेकडून आधी नोटीस पाठवली जाते. शिवाय दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. यामध्ये पालिकेचे आदेश पाळले नाही तर न्यायालयीन कारवाईही करण्यात येते. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मागील जानेवारीपासून केलेल्या कार्यवाहीत तब्बल ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली.

अशी होते डासांची उत्पती -
मलेरियाचे डास पसरवणारा एनाफिलीस स्टिफेन्सी डासांची उत्पत्ती विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कुलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी होते. तसेच डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती फेंगशुई झाड, बांबू प्लँटस, मनीप्लँटससारखी शोभिवंत झाडे, घराजवळ ठेवलेल्या कुंड्या, एसी, फ्रीज अशा ठिकाणी होत असल्याचे समोर आले आहे.

स्वाइन फ्ल्यूचे १४ संशयित रुग्ण -
मुंबईसह राज्यभरात सध्या पार्‍याने चाळीशी पार केल्याने वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे विविध साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचा धोका वाढताना दिसतो आहे. स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच-१, एन-१’ विषाणूच्या संसर्ग झाल्याचे १४ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालये, मेडिकल कॉलेज, प्रसूतीगृहे, दवाखान्यांमध्ये प्रशासनाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी आहेत लक्षणे -
स्वाईन फ्ल्यूच्या ‘एच-१, एन-१’ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास तीव्र ताप, खोकला, घसा खवखवणे, दुखणे, थंडी वाजणे, सर्दी, अंगदुखी अशी लक्षणे आढळतात. औषध घेऊनही ही लक्षणे कमी होत नसल्यास स्वाईन फ्ल्यू झाल्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी स्वत:च उपचार न करता डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करून घ्यावेत आणि आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Intro:मुंबई -
साथींचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे मुंबईकर मात्र स्वत:च्या घरातच डेंग्यू, मलेरिया पोसत असल्याचे समोर आले आहे. मागील तीन महिन्यांत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने तपासणी केली. इमारती, घरे आणि डास उत्पत्तींच्या सुमारे चार लाखांहून अधिक ठिकाणी तपासणी केली असून यात ६०६ ठिकाणी मलेरिया, ३१०२ ठिकाणी डेंग्यू तर २७२४ ठिकाणी दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. पालिकेने या सर्वाना नोटीस बजावली असून प्रत्येक दिवशी ३० जणांना नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. Body:साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत पालिकेकडून वर्षभर जनजागृती केली जाते. शिवाय धुम्र फवारणी, डास-उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू असते. अस्वच्छता आणि पाणी साठून राहणार्‍या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे ही ठिकाणे नष्ट केली जात आहेत. पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे या कामाचा वेग आणखी वाढला आहे. जानेवारीपासून केलेल्या या तपासणी आणि कारवाई मोहिमेत मुंबईकरांचा याबाबत निष्काळजीपणा समोर येत आहे. या तपासणीत ६०६ ठिकाणी मलेरिया पसरवणारे एनॉफिलीज स्टिफेन्सी डासांच्या अळ्या, ३१०२ ठिकाणी डेंग्यू पसरवणारा एडिस इजिप्तीच्या तर २७२४ ठिकाणी दोन्ही आजार पसरवणारे डास आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी डास उत्पन्न होणार नाहीत, अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

दंडात्मक कारवाई होणार --
डेंग्यू-मलेरिया उत्पन्न करणारे ठिकाणे आढळल्यास पालिकेकडून आधी नोटीस पाठवली जाते. शिवाय दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. यामध्ये पालिकेचे आदेश पाळले नाही तर न्यायालयीन कारवाईही करण्यात येते. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मागील जानेवारीपासून केलेल्या कार्यवाहित तब्बल ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली.

अशी होते डासांची उत्पती --
मलेरियाचे डास पसरवणारा एनाफिलीस स्टिफेन्सी डासांची उत्पत्ती विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कुलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी होते. तसेच डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती फेंगशुई झाड, बांबू प्लँटस, मनीप्लँटससारखी शोभिवंत झाडे, घराजवळ ठेवलेल्या कुंड्या, एसी, फ्रीज अशा ठिकाणी होत असल्याचे समोर आले आहे.

स्वाइन फ्ल्यूचे १४ संशयित रुग्ण
मुंबईसह राज्यभरात सध्या पार्‍याने चाळीशी पार केल्याने वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे विविध साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचा धोका वाढताना दिसतो आहे. स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच-१, एन-१’ विषाणुच्या संसर्ग झाल्याचे १४ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालये, मेडिकल कॉलेज, प्रसूतीगृहे, दवाखान्यांमध्ये प्रशासनाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी आहेत लक्षणे --
स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच-१, एन-१’ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास तीव्र ताप, खोकला, घसा खवखवणे, दुखणे, थंडी वाजणे, सर्दी, अंगदुखी अशी लक्षणे आढळतात. औषध घेऊनही ही लक्षणे कमी होत नसल्यास स्वाइन फ्ल्यू झाल्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी स्वत:च उपचार न करता डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करून घ्यावेत आणि आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.