ETV Bharat / state

गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय पाडले; नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी - mumbai Siddharth Hospital news

धोकादायक झालेले गोरेगाव येथील पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय धोकादायक असल्याचे सांगून पाडण्यात आले. पालिकेने हे रुग्णालय पाडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Demolished Siddharth Hospital in Goregaon, Mumbai
मुंबई, गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय पाडले
author img

By

Published : Oct 3, 2020, 10:54 AM IST

मुंबई- धोकादायक झालेले गोरेगाव येथील पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय धोकादायक असल्याचे सांगून पाडण्यात आले. पालिकेने हे रुग्णालय पाडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रुग्णालयाच्या जागी ३०६ बेडचे सुसज्ज रुग्णालय बांधले जाणार आहे. त्यामुळे गोरेगाव-मालाडमधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी माहिती पालिका सर्वसाधारण रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.

गोरेगाव येथे पालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय आहे. १९९५ - १९९७ दरम्यान ही इमारत बांधून येथे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयामुळे गोरेगाव ते मालाड भागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत होती. मात्र १७ महिन्यापूर्वी या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचे सांगत रुग्णालय बंद करण्यात आले. रुग्णालय बंद केल्याने येथील स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत सिद्धार्थ रुग्णालय बचाव संघर्ष समिती स्थापन केली. समितीच्या माध्यमातून वर्ष भरापासून आंदोलन, जनजागृती, माहिती अधिकाराखाली रुग्णालया संबधी माहिती मागवणे. सबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देणे, अशी चळवळ चालू ठेवली.

सध्या लोक जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. पत्रक वाटून लोकांच्या सह्या घेतल्या जात आहेत. सिद्धार्थ रुग्णालय वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच गुरुवार १ ऑक्टोबरपासून हे रुग्णालय पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सिद्धार्थ रुग्णालय बंद असल्याने या विभागातील नागरिकांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात किंवा कांदिवली येथील भगवती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ये-जा करावी लागत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. तसेच ही इमारत २५ वर्षातच धोकादायक कशी झाली?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव पश्चिमेला पालिकेने ११७ बेडचे सिद्धार्थ रुग्णालय १९९७ मध्ये बांधले. मात्र, रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने गेले दीड वर्ष हे रुग्णालय बंद होते. त्यामुळे गोरेगाव-मालाडमधील रुग्ण जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर, कांदिवली येथील भगवती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात. मात्र, आता सिद्धार्थ रुग्णालयाच्या जागी सुसज्ज असे ३०६ बेडचे रुग्णालय बांधले जाणार आहे, अशी माहिती पालिका सर्वसाधारण रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.