ETV Bharat / state

विक्रोळीमध्ये डिलिव्हरी बॉयची धारदार शस्त्राने हत्या - tejkumar ram

शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका डिलिव्हरी बॉयची धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या झाल्याची घटना विक्रोळी सर्व्हिस रोड लगत असलेल्या भुयारी मार्गावर घडली आहे.

मृत तेजकुमार राम
author img

By

Published : Aug 4, 2019, 5:17 AM IST

Updated : Aug 4, 2019, 6:35 AM IST

मुंबई - पूर्व उपनगरात हत्यांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका डिलिव्हरी बॉयची धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या झाल्याची घटना विक्रोळी सर्व्हिस रोड लगत असलेल्या भुयारी मार्गावर घडली आहे.

विक्रोळीमध्ये डिलिव्हरी बॉयची धारदार शस्त्राने हत्या

तेजकुमार राम (वय 22 वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. तेजकुमार हा सर्व्हिस रोड वरून पार्सल देण्यासाठी जात असताना दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जवळील महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्या करून आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

त्यांची ओळख अजून पटली नसून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे. लुटण्याचे हेतूने ही हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तेजकुमार हा गायक सुद्धा होता. त्याचे अनेक व्हिडिओ हे युट्युबवरही आहेत. पूर्व उपनगरात गुन्हेगारी फोफावली असून पोलिसांचा धाक आता उरला नसल्याचे सामान्य नागरिक बोलत आहेत.

विक्रोळीत गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या आठवड्याभरात 4 घरफोडी झाल्या आहेत. विक्रोळी पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही. पोलिसांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी, असे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी सांगितले.

Intro:मुंबई

पूर्व उपनगरात हत्यांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री 10.30 दरम्यान एका हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या तेजकुमार राम या 22 वर्षीय युवकाची चाकूने हल्ला करत हत्या केल्याची विक्रोळी सर्व्हिस रोड लगत असलेल्या भुयारी मार्गावर घडली आहे.
Body:तेज हा सर्व्हिस रोड वरून पार्सल देण्यासाठी जात असताना दोन जणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला त्याला जवळील महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराआधीच त्याला मृत घोषित केले. हत्या करून आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले. त्यांची ओळ्ख अजून पटली नसून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे. लुटण्याचे हेतूने ही हत्या केला असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. तेजकुमार हा गायक सुद्धा होता. त्याचे अनेक व्हिडिओ हे युट्युवर ही आहेत. पूर्व उपनगरात गुन्हेगारी फोफावली असून पोलिसांचा वचक आता उरला नसल्याचे सामान्य नागरिक बोलत आहेत.

विक्रोळीत गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या आठवड्याभरात चार घरफोडी झाल्या आहेत. विक्रोळी पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी असे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी सांगितले.

Vis

Hotel , spot, hospital

Byte

संजय जोशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक

उपेंद्र सांवत स्थानिक नगरसेवक

फोटोही जोडले आहेत.

Conclusion:
Last Updated : Aug 4, 2019, 6:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.