मुंबई - श्रद्धा खून प्रकरणाच्या ( Shraddha murder case ) तपासासाठी मुंबईत तळ ठोकून असलेले दिल्ली पोलिसांचे पथक, आरोपी आफताब पूनावालाने काम केले त्या पंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणार ( Delhi Police Investigate hotel staff Aftab worked ) आहे. प्रशिक्षणार्थी आचारी म्हणून त्याने या हॉटेलमध्ये काम केले होते. दिल्लीचे दोन पोलिस अधिकारी कर्मचार्यांना आफताबबद्दल विचारपूस करतील, तर एक अधिकारी पालघरमधील वसईत तपास करेल.
जबाब नोंदवणे सुरू : याआधी रविवारी, दिल्ली पोलिसांच्या पथकाने आफताब त्याच्या कुटुंबासह राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाचे जबाब ( Shraddha murder case started statement Recording ) नोंदवले. एक तासाहून अधिक काळ जबाब नोंदवले गेले. आफताबच्या कुटुंबाने त्यांचे घर 20 दिवसांपूर्वी रिकामे केले होते. आफताबचे कुटुंब कुठे गेले याबद्दल माहिती नाही आणि त्यांनी शेअर केलेला नंबर देखील बंद आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धा आणि आफताबच्या मित्र आणि नातेवाईकांसह अनेकांना बोलावले असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.
व्हॉट्सअॅप चॅट्सचाही वापर : आरोपी आफताब हा श्रद्धासोबत मुंबईतील वेगवेगळ्या भागात राहत होता. याआधी शनिवारी पोलीसांच्या पथकाने श्रद्धाची मैत्रीण शिवानी म्हात्रे आणिकरण बेहरी यांचे जबाब नोंदवले. दिल्ली पोलीस पुरावा म्हणून त्या दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचाही वापर (WhatsApp chats Use for proof ) करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात श्रद्धाचा जवळचा मित्र लक्ष्मण नाडर आणि श्रद्धा आफताब दिल्लीला जाण्यापूर्वी ज्या फ्लॅटमध्ये राहत होते त्या फ्लॅटचे मालक राहुल गॉडविन यांच्यासह एकूण सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत.
10 नोव्हेंबरला एफआयआर नोंदवला : दिल्ली पोलिसांना श्रद्धाच्या वडिलांची तक्रार मिळाली आणि 10 नोव्हेंबरला एफआयआर नोंदवला ( FIR was registered on November 10 ) . दिल्ली पोलिसांच्या चौकशीत आफताब पूनावालाने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सुरूवात केली. मानवी शरीरशास्त्राबद्दल वाचले होते जेणेकरून तिचा मृतदेह कापण्यात मदत झाली असे त्याने पोलिसांना सांगितले.