मुंबई : अलीकडेच झवेरी बाजार 2 कोटींच्या लूट प्रकरणी तोतया 3 ईडी अधिकाऱ्यांना 24 तासात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा धानजी स्ट्रीट येथील एका व्यावसायिकाला सोन्याचे दागिने बनवून मुंबईसह दुबईत एक्सपोर्ट करण्याचे आमिष दाखवून १२ कोटी ३१ लाखांना चुना लावला आहे. याप्रकरणी ७ फेब्रुवारीला लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४०९, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ? : धानजी स्ट्रीट येथे सोन्याची व्यापारी यांची कंपनी असून त्यांच्यासोबत मागील काही दिवस पाहिजेत आरोपी हे सोन्याचा कच्चा माल घेऊन दागिने बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. काही दिवस प्रामाणिकपणे तक्रारदार व्यवसायिकासोबत काम करून विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी १ ते दीड कोटी रुपयांची रक्कम आणि साडेदहा कोटींचे सोने घेऊन लंपास झाले. अनेक दिवस झाले तरी आरोपी यांचा काही संपर्क होत नव्हता. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यावसायिक यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान हि फसवणूक झाली आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग : लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी या गुन्ह्यातील ५ हुन अधिक पाहिजेत आरोपींचा शोध घेत आहेत. याआधी देखील धानजी
स्ट्रीटवरून सोने लुटले : अलीकडेच तोतया ईडी अधिकारी बनून दोन इसमांनी तक्रारदार यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे जबरदस्तीने खिसे तपासण्यास सुरुवात केली. सर्व कामगार हे त्यांना विरोध करत होते. दरम्यान कामगार माली यांचे खिश्यामध्ये असलेले २.५ किलो (२२ कॅरेट) वजनाचे सोने आणि कार्यालयात कांउटरमध्ये असलेले ५०० ग्रॅम सोन्याची लगड त्यांनी जबरीने काढून घेऊन कार्यालयातील कर्मचारी असलेल्या दशरथ माली यांच्या देखील जोरात कानशिलात मारली होती. यावेळी तक्रारदार त्यांना पुन्हा 'तुम्ही कोण आहेत व इतर कागदपत्रे दाखवा असे त्यांना सांगितले असता, तुमको जान से मार डालूंगा' अशी धमकी देऊन कामगार दशरथ माली याचे हातात हातकडी घातली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या दुकानातील घेतलेले रोख रुपये आणि सोने तसेच मोबाईल्स फोन घेऊन तसेच तक्रारदार व कामगार यांना देखील ताब्यात घेऊन ते बिल्डींगच्या खाली आले.
पोलिसांनी 24 तासांत लावला छडा होता : यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे काका यांना बोलावून घेवून त्या परिसरात ईडी अधिकाऱ्यांचा शोध घेतला होता. परंतु, ते सापडले नाहीत म्हणून फिर्यादी यांनी आजुबाजुच्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर घडलेली घटना पोलीसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार यांचा सविस्तर जबाब नोंद करुन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३९४, ५०६ (२), १२०(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
२४ तासाच्या आत आरोपी ताब्यात : तोतया ईडी अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेली 25 लाखांची रक्कम आणि तीन किलो सोने यापैकी काही मुद्देमाल हा वरळी येथील मित्राकडे ठेवला असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली होती. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांच्या पथकाने या घटनेचा तपास करून दोन कोटींपैकी 15 लाखांची रोख रक्कम आणि अडीच किलो सोने वरळी येथून जप्त केले होते. त्याचप्रमाणे उर्वरित मुद्देमालाचा तपास पोलीस करत आहेत. अटक महिला विशाखा मुधोळे तिच्यावर याआधी देखील चेक बाउन्स झाल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचे अनुषंगाने गोपनीय माहीतीच्या आधारे गुन्हा घडल्यानंतर २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : Adil Durrani In Judicial Custody : राखी सावंतचा पती आदिल दुर्राणीला न्यायालयीन कोठडीत