ETV Bharat / state

Pune News : पुणे महापालिका अधिकाऱ्याची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल

पुणे महानगरपालिकेतील अभियंता प्रशांत वाघमारे यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यात येत आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर बदनामीकारक खोटा आणि चुकीचा मजकूर टाकून त्यांची बदनामी करण्यात आली आहे.

pune municipal corporation
पुणे महानगरपालिका
author img

By

Published : Feb 4, 2023, 1:56 PM IST

पुणे : प्रशांत वाघमारे हे पुणे महानगरपालिकेत शहर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक खोटा आणि चुकीचा मजकूर टाकून त्यांना बदनाम करण्यात आले आहे. त्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत वाघमारे (वय 54, रा. रोहन निलय, औंध) यांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दिली आहे.

अनधिकृत कामांविरोधात कारवाई : मागील काही दिवसात प्रशांत वाघमारे यांनी पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे घरे आणि झोपडपट्ट्या यांच्याविरुद्ध ठोस कारवाई केली होती. केलेल्या कारवाईनंतर ट्विटरवर त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकला असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी Legal Rights Observatory LRO या ट्विटर अकाउंट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वीही कारवाई : काही दिवसांपूर्वीही पुणे महापालिकेवर कारवाई झाली होती. पुणे महापालिकेकडून एम आर टी पी १९६६ अनन्वे कलम ५३ नुसार संबंधित लोहगाव अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावली असता कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने बांधकामांचे क्षेत्र 4000 चौरस फुट आरसीसी व पत्रा शेड 9000 चौ फूट असे एकूण 13000 चौ फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. हे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून 3 ब्रेकर,2 जेसीबी, 2 ग्रॅस कटर, ८ बिगारी , पोलिस वर्गासमवेत कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पुणे महापालिकेकडून कार्यकारी अभियंता अजित सुर्वे, उपअभियंता हनुमान खलाटे, शाखा अभियंता प्रतीक पाथरकर, संदीप धोत्रे, प्रकाश कुंभार, टूलीप इंजिनीयर यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली.

स्वच्छता मोहीम सुरू : पुणे महापालिकेने गेल्या आठवड्यापासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रस्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अशा विविध सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेकजण या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत, अशा लोकांवर आता पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या १० दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून महापालिकेने साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पहिल्या तीन दिवसांतच १२३ लोकांवर कारवाई करत १.२३ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : BMC Budget 2023 : मुंबई महानगरपालिकेचा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, पहिल्यांदाच पन्नास हजार कोटींचा टप्पा पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.