ETV Bharat / state

सत्यमेव जयते: ठाकरे घटना मानत नव्हते, म्हणून निवडणूक आयोगानं नाकारलं; दीपक केसरकरांचा हल्लाबोल - निवडणूक आयोग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आमची बाजू न्यायाची आहे, त्यामुळं आमदार अपात्रता प्रकरणात आमचाच विजय होणार आहे, असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला कोणताही आधार नाही, अशी टीकाही मंत्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी 'सत्यमेव जयते' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 1:19 PM IST

मुंबई Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आमची बाजू सत्याची असून ती आम्ही मांडली आहे. देशात असलेली लोकशाही पक्षातही असायला हवी. मात्र ठाकरे लोकशाही मानत नव्हते. त्यामुळं त्यांना निवडणूक आयोगानं नाकारलं, असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यांनी पक्षात घटना बदलली, त्याला निवडणूक आयोगाची मान्यताही घेण्यात आली नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला कोणताही आधार नाही, अशी टीकाही मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

पक्षाच्या घटनेमध्ये करण्यात आला बदल : शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहेत. मात्र शिवसेना पक्षात लोकशाही नव्हती असा, हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घटना बनवली, ती निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार लोकशाहीपूरक होती. मात्र त्यानंतर घटनेमध्ये बदल करण्यात आला होता. त्यानुसार आपणच लोकांना निवडायचं आणि त्यांनीच आपणाला निवडून द्यायचं असा प्रकार होता. मात्र याबाबत निवडणूक आयोगाची मान्यताच घेण्यात आली नव्हती. ही दुरुस्ती जेव्हा सादर करण्यात आली, तेव्हा ती निवडणूक आयोगाने नाकारली. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला, त्याला कोणताही आधार नाही, अशीही टीका मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केली.

आमदार अपात्रता प्रकरणावर आज येणार निकाल : शिवसेनेचे नेता एकनाथ शिंदे यांनी आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला जात बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं. मात्र त्यानंतर राज्यात शिवसेनेतील दोन गटात चांगलंच राजकारण रंगलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष याबाबतीत निर्णय देण्यात विलंब करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढही दिली. ती मुदत आज 10 जानेवारी रोजी संपत आहे. राहुल नार्वेकर हे आजच निकाल देणार आहेत. मात्र या निकालावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांसह त्यांना साथ देणाऱ्या आमदारांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर भेट : उद्धव ठाकरे गटाची 'या'साठी सर्वोच्च न्यायालयात धाव
  2. संजय राऊतांनी शिवसेनेचं किती नुकसान केलंय हे मी जाणतो - दीपक केसरकर
  3. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर थेट होणार जागावाटपात परिणाम, कोणाचे पारडे होणार जड?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.