ETV Bharat / state

Devendra Fadnavis: राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार; देशातील हा पहिलाच प्रयोग - देवेंद्र फडणवीस - Maharashtra cabinet decision

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी, मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना २ राबविण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Chief Minister Solar Agriculture Pump
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 20, 2023, 10:35 AM IST

*शेती पंपांना दिवसा अखंडित वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली मागे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेच वापर करण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने शासन प्रयत्नशील असताना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडवणीस यांनी माहिती दिली.

हेक्टरी वार्षिक सव्वा लाख रुपये: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे. त्यासाठी कृषीचे फिडर सोलरायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ३० वर्षाच्या भाडेतत्वाच्या करारावर सरकारला जागा द्यायची आहे. व त्या बदल्यात शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक सव्वा लाख रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होणार असून पाच किलोमीटर क्षेत्रातील जमीन सुद्धा घेतली जाणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता होईल व हे सोलरसाठी फार उपयुक्त असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

३ ते ३ रुपये ३० पैसे दर: सोलार गुंतवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदार उपलब्ध असून आज सरकारकडून शेतकऱ्यांना सब्सिडी दिली जाते, त्याचा दर ७ रुपये आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून दीड रुपया वसूल करून त्यांना सब्सिडी दिली जाते. सोलार वीज ही दिवसा सुद्धा शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. ती ३ रुपयांनी किंवा ३ रुपये ३९ पैसे प्रमाणे पडणार आहे. म्हणजे सब्सिडीमध्ये सुद्धा घट होणार असून पर्यावरणाची होणारी हानी सुद्धा या कारणास्तव वाचणार असल्याच देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे. तसेच देशात अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. यापूर्वी राळेगणसिद्धी येथे सुद्धा फिडर तयार केले गेले, ते मागील चार वर्षापासून व्यवस्थित चालू आहे. त्यानंतर ९०० मेगावॅटचे फिडर तयार केले गेले आहेत. आता ८ हजार मेगावॅटचे सर्व फिडर सोलरायझेशन करण्यात येणार असल्याचेही ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे.

भाजपच्या नेत्यांना मिळणार दिलासा-भाजप नेत्यांच्या नऊ सहकारी साखर कारखान्यांनाही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याशी संबंधित प्रस्तावावर राज्य सरकारकडून उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपसमितीने शिफारशी केल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Ajit Pawar BJP Alliance महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न अजित पवारांची भूमिका संशयास्पद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.