मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे पहाटेपासून जमू लागले आहेत. बाळासाहेंबाच्या स्मृतीस्थळी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या वर्षीच्या स्मृतिदिनी राजकीय समीकरणांची एक वेगळी किनार पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उपस्थिती लावून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. तर काँग्रेसचे नेते भाई जगताप, शिवसेनेचे संजय राऊत, मनोहर जोशी, दिवाकर रावते, रामदास कदम, स्मृती स्थळावर उपस्थिती लावून बाळासाहेबांना अभिवादन केले.
एरव्ही भाजप नेते आणि शिवसेना नेते एकत्र दिसत होते. मात्र राज्यात सत्ता स्थापनेवरून राजकीय नाट्य रंगत असताना, शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसही नवी आघाडी उदयास येत आहे. आज बाळासाहेंबाच्या स्मृतिदिनी या आघाडीच्या नांदीमुळे एक नवीन चित्र पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे नेते भाई जगताप बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी शिवसेना नेते सुभाष देसाई, रविंद वायकर, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची देखील उपस्थिती आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी स्मृतिस्थळी जाऊन बाळांसाहेबांना आदरांजली वाहली. या स्मृतिदिनी ठाकरे घराण्यातील पहिल्यांदाचा निवडणूक लढवणारे आमदार आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांना अभिवादन करणार हे विशेष आहे. तसेच महाराष्ट्रात निर्माण होणारे नवीन समीकरण राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेते देखील याठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येऊ शकतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..
बाळासाहेंबाच्या स्मृतिदिनानिमित्त आज अनेक राजकीय दिग्गजांनी त्यांना ट्विटरवरून अभिवादन केले आहे.