ETV Bharat / state

Salim Fruit withdraws Bail Application अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम फ्रुटने डिफॉल्ट जामीनाचा अर्ज घेतला मागे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) हस्तक आणि छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटने विशेष न्यायालयात ( Special Court Mumbai ) जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपपत्रात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याचा दावा सलीम फ्रुटच्या ( Salim Fruit withdraws default Bail Application ) वतीने करण्यात आला होता. मात्र पोलीस अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाली असल्याने सलीम फ्रुटने आपला अर्ज मागे घेतला आहे.

Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit
दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम फ्रुट
author img

By

Published : Jan 5, 2023, 6:51 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ( Dawood Ibrahim Close Aide Salim Fruit ) हस्तक सलीम फ्रुटने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ( Special Court Mumbai ) मकोका कोर्टात डिफॉल्ट जामीनासाठी धाव घेतली होती. ज्या मुद्द्यावर डिफॉल्ट जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यामुळे त्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. त्यामुळे अखेर सलीम फ्रुटच्या ( Salim Fruit withdraws default Bail Application ) वतीने अर्ज मागे घेण्यात आला आहे. सलीम फ्रुट विरोधात खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

आरोपपत्रात अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याचा दावा सलीम फ्रुट विरोधात खंडणी विरोधी पथकाकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र या आरोपपत्रात वरिष्ठ अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्यामुळे हे आरोपपत्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता दाखल करण्यात आल्याचा दावा सलीम फ्रुटच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे सलीम फ्रुटच्या ( Salim Fruit withdraws Bail Application ) वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सलीम फ्रुट याच्या वतीने वकील अॅड विकर राजगुरू यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सलीम फ्रुटने वकिलाच्या मार्फत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टातून मागे घेतला आहे.

काय आहे प्रकरण अंधेरीतील व्यवसायिकाला 75 लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणात वर्सोवा पोलिसांकडून सलीम फ्रुटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलचा मेव्हणा ( Chhota Shakeel's brother-in-law ) सलीम फ्रुट आणि रियाज भाटी यांच्यासह इतर पाच आरोपींचा समावेश आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी रियाज भाटी, मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट, अमजद राया रेडकर, समीर ताज खान, अजय हिम्मतलाल गोसाळीया, जावेद शाबुद्दीन खान आणि फिरोज हुसेन शेख यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सलीम फ्रुटच्या मार्फत छोटा शकीलकडून धमकी पीडित तक्रारदाराकडून पत्त्यामध्ये हारलेले 75 लाख रुपयांची मागणी वारंवार करत होता. तक्रारदाराने पैसे दिले नसल्याने सलीम फ्रुटच्या मार्फत छोटा शकीलकडून धमकी देण्यात आली होती, असा आरोप रियाज भाटीवर मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. अंधेरीतील व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी कार आणि 7 लाखांहून अधिक रुपये आरोपींनी उकळले होते. व्यावसायिकाने जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.