ETV Bharat / state

दावोसमध्ये आतापर्यंत किती कोटींचे करार? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 10:52 AM IST

CM Speech From Dawos : स्वित्झर्लंडमधील दावोस इथं असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आता 3 लाख 10 हजार 850 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. ही माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री समाज माध्यमातून दिलीय.

CM Speech From Dawos
CM Speech From Dawos

मुंबई CM Speech From Dawos : स्वित्झर्लंडमधील दावोस इथं जागतिक आर्थिक परिषद सुरू आहे. या परिषदेच्या दोन दिवसांत महाराष्ट्रानं 3 लाख 10 हजार 850 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. तर आज गुरुवारी 42 हजार 825 कोटींचे करार होणार आहेत. जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून 3 लाख 53 हजार 675 लाख कोटीं रुपयाचे विक्रमी सामंजस्य करार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून दिलीय. याव्यतिरिक्त 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवल्यानं राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढलाय, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांच्या माध्यमातून राज्यात 2 लाख रोजगारांची संधी उपलब्ध होईल, अशा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

झटपट निर्णय घेणारं लोकाभिमुख राज्य : जागतिक आर्थिक परिषदेत होत असलेले सामंजस्य करार फक्त कागदावरच न राहता त्याची प्रत्यक्षित जलदगतीनं अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असणार आहे. गेल्या वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक सामंजस्य करारावर भर असणार आहे. उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारं लोकाभिमुख राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळ्ख जगभर निर्माण झाल्याची प्रचिती इथं आल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

  • स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री… pic.twitter.com/NsvUkDJ9el

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रोजगार निर्माण होणार : दावोस परिषदेत पहिल्या दिवशी 16 जानेवारीला 6 उद्योगासोबत 1 लाख 2 हजार कोटींचे गुंतवणुकीचे करार केले. यातून 26 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी 17 जानेवारीला 8 उद्योगांशी 2 लाख 8 हजार 850 कोटींची गुंतवणूक झाली. त्यातून 1 लाख 51 हजार 900 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यानंतर आज 18 जानेवारीला 6 उद्योगांबरोबर 42 हजार 825 कोटींचे करार होईल त्यातून 13 हजार रोजगार निर्माण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय.

आतापर्यंत कोणते करार : महाप्रीतनं हरित उर्जा प्रकल्पांसाठी 56 हजार कोटींचे करार केले आहेत. यात अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत 4 हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जीसोबत 8 हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी 3000 मध्ये 40 हजार कोटी, व्हीएचएम ओमान सोबत 4 हजार कोटींचे करार केले आहेत. तसंच आज 18 जानेवारीला सुरजागड इस्पात 10 हजार कोटीचे सामंजस्य करार यातून 5 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. कालिका स्टीलबरोबर 900 कोटी यातून 800 रोजगार निर्माण होणार आहेत. मिलियन स्टीलसोबत 250 कोटी यातून 300 रोजगार, ह्युंदाई मोटर्स 7 हजार कोटी यातून 4 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. कतारची एएलयु टेक सोबत 2075 कोटी यातून 400 रोजगार तर सीटीआरएल एस 8600 कोटी करारच्या माध्यमातून 2500 रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या उद्योगांनी 1 लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखवले. यात अर्सेलर निपॉन मित्तल तसंच सौदी, अरब, ओमान येथील उद्योग समूहाचा समावेश आहेत.

हेही वाचा :

  1. दावोस परिषदेत महाराष्ट्र अग्रेसर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
  2. Uday Samant In Davos : दावोसमध्ये 45 हजार कोटींचे सामंजस्य करार; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.