ETV Bharat / state

जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या; 'हे' आहे कारण

घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका तरुणीच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला. यात वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Jul 15, 2019, 10:16 PM IST

मुंबई - घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका तरुणीच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला. यात वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी वडील राजकुमार चौरसिया याला अटक करण्यात आली आहे.

मृत मीनाक्षी चौरसिया (वय २० वर्षे) हीचे ब्रिजेश चौरसिया नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध वडील राजकुमार चौरसिया यांना मान्य नव्हते. वडिलांनी मीनाक्षीचे २ वेळा लग्न इतर ठिकाणी जमवले होते. मात्र, मीनाक्षीने दोन्ही वेळा वडिलांनी जमवलेल्या लग्नास नकार देत पळून जाऊल लग्न केले होते. यामुळे पित्याने मुलीची हत्या केली. पोलिसांनी खूनी पित्यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

जन्मदात्या पित्यानेच केली गरोदर मुलीची हत्या 'हे' आहे कारण

अल्पवयीन असताना गेली होती पळून

मीनाक्षीच्या वडिलांनी मीनाक्षीचे लग्न ठरवले होते. मात्र, त्यास नकार देत मीनाक्षी घरातून पळून गेली. पळून गेल्यावेळी ती अल्पवयीन होती. लग्नाचे वय होताच दोघांनी मार्च महिन्यात लग्न केले. दरम्यान, ब्रीजेश चौरसीया आणि मीनाक्षीचे वडील राजकुमार चौरसिया यांच्या घरचे संबंध सुधारू लागले. पण, मुलीने मनाविरूद्ध पळून जाऊन लग्न केल्याचा राग राजकुमारच्या मनात होता.

पानवाल्याशी विवाह केल्याने कुटुंबाचा रोष
गावामध्ये आपल्या समाजात अब्रू गेली. लोक काय म्हणतील, एका पानवाल्याशी तीने विवाह केला, अशा विविध प्रश्नांनी राजकुमारच्या मनात सल कायम होती. राजकुमारने मुलीला खर्चासाठी पैसे आणि कपडे देतो, असे सांगून बाहेर बोलावले. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने मीनाक्षीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली.

चार महिन्याची होती गर्भवती
मृत्यूनंतर मीनाक्षीच्या शवविच्छेदनात ती ४ महिन्याची गरोदर असल्याची बाब उघड झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:घाटकोपर जन्मदात्या वडिलांनी संपवले मुलीला

Update byte पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग

घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका तरुणीच्या हत्येचा पोलिसानी उलगडा केला यात वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरोपी वडिल राजकुमार चौरसिया यास अटक करण्यात आली आहे.Body:घाटकोपर जन्मदात्या वडिलांनी संपवले मुलीला

घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका तरुणीच्या हत्येचा पोलिसानी उलगडा केला यात वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आरोपी वडिल राजकुमार चौरसिया यास अटक करण्यात आली आहे.

मयत मीनाक्षी चौरसिया २० वर्षीय मुलीचे ब्रिजेश चौरसिया नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध वडील राजकुमार चौरसिया यांना मान्य नव्हते.

वडिलांनी मीनाक्षीचे 2 वेळेस लग्न इतर ठिकाणी जमवले होते. मात्र, मीनाक्षीने दोन्ही वेळा वडिलांनी जमवलेल्या लग्नास नकार दिला होता. मृत मीनाक्षीने प्रियकर ब्रिजेश चौरसियासोबत विवाह केला. - मीनाक्षी च्या वडिलांनी मिनाक्षीचे लग्न ठरवले होते मात्र त्यास नकार देत मीनाक्षी घरातून पळून गेली आणि मीनाक्षी ने वडिलांच्या मर्जी विरोधात ब्रिजेश चौरसिया सोबत या वर्षी मार्च महिन्यात लग्न केले , मिनाक्षी चा पती चे पानांचे दुकान आहे , दोघेही प्रेमात होते मात्र त्यांच्या लग्नाला मीनाक्षी च्या वडिलांचा विरोध होता ,मीनाक्षीचे वय लग्नासाठी कमी होते.त्यामुळे दोघेही पळून गेले आणि मीनाक्षी वयाने मोठी झाल्यावर दोघांनी लग्न केले.गावामध्ये आपल्या समाजात अब्रू गेली म्हणून आणि लोक काय म्हणतील म्हणून बापाने हत्या केली.हत्येच्या वेळी मीनाक्षी ही चार महिन्याची गरोदर असल्याची बाब शवविच्छेदनात उघड झाली. , या दरम्यान वडील आणि मीनाक्षी च्या सासरच्यानचे संबंध सुधारले होते .मात्र वडिलांच्या डोक्यात राग हा कायम होता .यावरूनच तुला पैसे आणि कपडे देतो सांगून बाहेर बोलावले आणि तीक्ष्ण हत्याराने मीनाक्षीचा गळा जन्मदात्या बापाने चिरून निर्घृणपणे पोटच्या पोरीची हत्या केली.

हा विवाह मान्य नसल्याने आरोपी वडिलांना याची सल कायम होती.पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.