ETV Bharat / state

तज्ज्ञ सल्लागार समितीकडून पुन्हा होणार धोकादायक पुलांचे ऑडिट - धोकादायक

पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेतर्फे २९ पूल पुनर्बांधणीसाठी व डागडुजीसाठी बंद केले आहेत. हे पूल बंद केल्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. याच मुद्द्यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी काही तज्ज्ञमंडळी, पूल इंजिनियर्स, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची भेट घेतली.

पूल धोकादायक
author img

By

Published : Jun 27, 2019, 10:56 AM IST

मुंबई - शहरातील 29 पूल धोकादायक असल्याने पुनर्बांधणी व डागडुजीसाठी महापालिकेने बंद केले आहेत. या पुलांचे पुन्हा ऑडिट करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार समितीची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिल्याचे माजी खासदार व माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.

Dangerous Bridge
धोकादायक पुलांचे तज्ज्ञ सल्लागार समितीमार्फ़त पुन्हा होणार ऑडिट

पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेतर्फे २९ पूल पुनर्बांधणीसाठी व डागडुजीसाठी बंद केले आहेत. हे पूल बंद केल्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. याच मुद्द्यांसाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी काही तज्ज्ञमंडळी, पूल इंजिनियर्स, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये पूल तज्ज्ञ शिरीष पटेल, डॉ. शेणॉय, डॉ. नुरी, सामाजिक कार्यकर्त्या सुचेता दलाल व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आदींचा समावेश होता.

या भेटीदरम्यान २९ धोकादायक पुलांचे ऑडिट करण्यासाठी मुंबई महापालिका नामांकित पूल तज्ज्ञ, प्रसिद्ध व तज्ज्ञ इंजिनिअर्स असलेली पूल सल्लागार समिती नेमणार असून या सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट केले जाणार आहे. तसेच त्याची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळावी म्हणून ज्या पुलांचे काम, पुनर्बांधणी किंवा डागडुजी करणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती म्हणजेच पूल कधी बंद केला, पुन्हा कधी सुरू होणार, त्यासाठी किती खर्च लागणार, याचे होर्डिंग प्रत्येक पुलाच्या बाहेर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले.

Intro:मुंबई
शहरातील 29 पूल धोकादायक असल्याने पुनर्बांधणी व डागडुजीसाठी महापालिकेने बंद केले आहेत. या पुलांचे पुन्हा ऑडिट करण्यासाठी तज्ञ सल्लागार समितीची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिल्याचे माजी खासदार व माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.Body:पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेतर्फे २९ पूल पुनर्बांधणीसाठी व डागडुजीसाठी बंद केले आहेत. हे पूल बंद केल्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. याच मुद्द्यांसाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी काही तज्ञमंडळी, पूल इंजिनियर्स, पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये पूल तज्ज्ञ शिरीष पटेल, डॉ. शेणॉय, डॉ. नुरी, सामाजिक कार्यकर्त्या सुचेता दलाल व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आदींचा समावेश होता. 

या भेटीदरम्यान २९ धोकादायक पुलांचे ऑडिट करण्यासाठी मुंबई महापालिका नामांकित पूल तज्ञ, प्रसिद्ध व तज्ञ् इंजिनिअर्स असलेली पूल सल्लागार समिती नेमणार असून या सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट केले जाणार आहे. तसेच त्याची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळावी म्हणून ज्या पुलांचे काम, पुनर्बांधणी किंवा डागडुजी करणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती म्हणजेच पूल कधी बंद केला, पुन्हा कधी सुरु होणार, त्यासाठी किती खर्च लागणार, याचे होर्डिंग प्रत्येक पुलाच्या बाहेर लावण्यात येईल असे आश्वासन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.