ETV Bharat / state

Dandia Fake Pass Case: 'फर्जी' वेब सिरीज पाहून बनवले दांडियाचे बनावट पास, चौघांना अटक - दांडिया बनावट पास प्रकरण

Dandia Fake Pass Case: मुंबईत दांडिया कार्यक्रमाच्या बनावट पास (Mumbai Dandiya Program) प्रकरणाचा गुन्हा १२ तासात उघडकीस आणून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक आरोपींकडून 36 लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dandia Pass Fraud Mumbai)

Dandia Fake Pass Case
अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 10:39 PM IST

दांडियाच्या बनावट पास प्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी

मुंबई Dandia Fake Pass Case: अटक आरोपींची नावे करण अजय शाह (वय २९ वर्षे), दर्शन प्रवीण गोहिल (वय २४ वर्षे), परेश सुरेश नेवरेकर (वय ३५ वर्षे) आणि कविष भालचंद्र पाटील (वय २४ वर्षे) अशी आहेत. याप्रकरणी तक्रारदार निरव मेहता (वय 38) यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 420 आणि 465 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Farji Web Series

वेब सिरीज बघून शोधली गुन्ह्याची युक्ती: महत्त्वाचे म्हणजे आरोपी करण शाह ग्राफिक डिझायनर असून त्याने 'फर्जी' ही वेब सिरीज पाहिल्यानंतर त्याला अशा प्रकारे गुन्हा करण्याची युक्ती सुचली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरीवली आणि आमदार सुनील राणे यांनी 14 ऑक्टोबरला रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास 'रंगरात्री दांडिया विथ किंजल दवे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरोपींनी आयोजकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट पासेस तयार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यात चार आरोपींचे निष्पन्न: गुन्हा नोंद होताच एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांच्या सोबत पथक नेमून गुन्हा उघडकीस करण्याबाबत सूचना दिल्या. तपास करत असताना साक्षीदार यांचे जबाब नोंद केले असता त्यात करण अजय शाह, दर्शन प्रवीण गोहिल, परेश सुरेश नेवरेकर, कविष भालचंद्र पाटील यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याच्या अनुषंगाने वॉंटेड आरोपी त्याच्या राहत्या घरी विरार, कांदिवली पूर्व या परिसरात मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध घेतला गेला. तसेच 20 ते 25 साक्षीदारांची पडताळणी केली असता ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

35 लाखांचा मुद्देमाल जप्त: एका आरोपीकडे चौकशी केली असता त्याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. अटक आरोपींकडून तीस लाख रुपयांचे बनावट पासेस आणि दहा हजार रुपयांचे 1000 होलोग्राम स्टिकर, लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर साधन सामग्री ज्याची किंमत पाच लाख रुपये अशी एकूण 35 लाख दहा हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

हेही वाचा:

  1. Sontu Jain Surrender : ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरण; आरोपी सोंटू जैनने पत्करली न्यायालयात शरणागती
  2. Mahadev Book App Scam : ऑनलाईन अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची सट्टेबाजी करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाइंडला मुंबई विमानतळावरून अटक
  3. Nithari Case : कोवळ्या मुलांचा बळी घेतलेलं निठारी हत्याकांड; आरोपी सुरेंद्र कोली, मोनिंदर सिंह पंढेर यांची निर्दोष मुक्तता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.