मुंबई : सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला यांना त्यांच्या घरात जाण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहवी लागत आहेत. 2015 मध्ये सायरस पुनावाला यांनी 120 मिलियन डॉलर अर्थात 750 कोटीची बोली लावून मुंबईतील लिंकन हाऊस खरेदी केले. तेव्हा याविषयी देशभर चर्ची झाली होती. परंतु आता 8 वर्षे होऊन गेली तरीसुद्धा सायरस पूनावाला यांना या घरामध्ये प्रवेश मिळालेला नाही आहे. प्रख्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला यांच्यासाठी आता हे घर अडचणीचे बनले आहे. ज्या जमिनीवर हे घर बांधले गेले आहे. त्या जमिनीच्या मालकी हक्कावरून विवाद सुरू असल्याने हा विवाद सायरस पुनावाला यांच्यासाठी मोठा अडचणीचा झाला आहे.
२ एकर परिसरात आलिशान घर : मुंबईतील रियल इस्टेट मधील सर्वात मोठी डील म्हणून ज्याकडे बघितले गेले, ते लिंकन हाऊस सायरस पूनावाला यांनी 2015 मध्ये 750 कोटी रुपयांना विकत घेतले. 2 एकर परिसरात मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी परिसरात 50 हजार स्क्वेअर फूटाचे हे घर आहे. तसेच सरकारच्या हेरिटेज यादीतसुद्धा याचा समावेश असून याला ग्रेड थ्रीचा दर्जाही प्राप्त आहे.
घराचा इतिहास?: वांकानेर राज्य हे मुंबईपर्यंत पसरलेले होते. तेव्हाचे साम्राज्याचे शेवटचे राजे महाराणा अमरसिंह यांनी मुंबईत हे घर बांधले होते. गुजरातहून मुंबईत आल्यावर वास्तव्यासाठी ते या घराचा वापर करत होते. पण 1957 मध्ये वांकानेर साम्राज्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला तो टॅक्स भरण्याचा, व त्यांनी हे लीजवर देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी अमेरिकन सरकारला 999 वर्षांच्या लीजवर हे हाऊस दिले. अमेरिकन लोकांनी या घरात दूतावास बसवला व या घराचे वांकानेर हे नाव बदलून लिंकन हाऊस ठेवले. पुढे 1957 पासून 2011 पर्यंत अमेरिकन दूतावास याच लिंकन हाऊसमध्ये राहिले. मात्र 2011 मध्ये त्यांनी आपला कारभार बांद्रा कुर्ला हाऊसमध्ये हलवल्याने लिंकन हाऊस रिकामी पडले.
अमेरिकन सरकारच्या तिजोरीत रक्कम जाऊ नये?: आज या बंगल्याची किंमत 987 कोटींच्या आसपास आहे. मात्र तरीही 8 वर्ष झाली तरी घराचा ताबा सायरस पूनावालांना मिळालेला नसल्याने, याबद्दल सायरस पुनावालांचे म्हणणे आहे की, एवढी मोठी रक्कम अमेरिकन सरकारच्या तिजोरीत जाऊ नये, म्हणून सरकारने या डीलवर बंदी आणली आहे. हा एक राजकीय आणि सामाजिक निर्णय आहे, असेही ते म्हणाले आहेत. एकंदरीत एवढ्या कोटीचे डील करून व इतकी वर्ष थांबूनही सायरस पूनावाला आजही या घरापासून बेघर आहेत.
संरक्षण संपदा विभागाच्या अखत्यारीत: पुढे 4 वर्षाने अमेरिकन सरकारकने लिंकन हाऊस विकण्याचा निर्णय घेतला. सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी 2015 मध्ये 750 कोटींचं डील करत हे घर विकत घेतले होते. पण 8 वर्ष झाली तरी यांना या घराचा ताबा मिळालेला नाही, कारण ज्या जागेवर लिंकन हाऊस आहे. ही जमीन संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संपदा विभागाच्या अखत्यारीत येत आहे. म्हणून या विभागाने डीलसाठी भाडेपट्टीचे अधिकार हस्तांतरित करणे गरजेचे आहे. संरक्षण विभागाने या डीलवर आक्षेप घेतला होता. परंतु तेव्हा असे सांगण्यात आले की, 20 दिवसांच्या आत विक्रीची नोटीस आणि प्रॉपर्टीचा वापर बंद करण्यासाठी गरजेचे असताना तसे झाले नाही. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेसुद्धा ही जमीन आपली असल्याचा दावा केला होता. तर इतकेच नाही, तर अमेरिका आणि भारताच्या राजकीय संबंधावरही याचा परिणाम दिसून आला.