मुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. वाऱ्याच्या वेगात आता प्रचंड वाढ झाली आहे. त्यासह कुलाबा, सांताक्रूज आणि गोव्यातही पाउस पडत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Cyclone Nisarga LIVE UPDATE : चक्रीवादळ अलीबागपासून २७० किलोमीटरवर; राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर पावसाला सुरूवात..
02:15 June 03
जोरदार पावसाला सुरुवात, वाऱ्याच्या वेगातही झाली वाढ
-
#CycloneNisarga over east-central Arabian Sea further moved north-northeast direction. Wind speed increases to 24 kmph from 20 kmph during past 1 hour at Ratnagiri (Maharashtra). Rainfall is continuing in Colaba, Santacruz and Goa: India Meteorological Department (IMD) pic.twitter.com/resS72Utq0
— ANI (@ANI) June 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#CycloneNisarga over east-central Arabian Sea further moved north-northeast direction. Wind speed increases to 24 kmph from 20 kmph during past 1 hour at Ratnagiri (Maharashtra). Rainfall is continuing in Colaba, Santacruz and Goa: India Meteorological Department (IMD) pic.twitter.com/resS72Utq0
— ANI (@ANI) June 2, 2020#CycloneNisarga over east-central Arabian Sea further moved north-northeast direction. Wind speed increases to 24 kmph from 20 kmph during past 1 hour at Ratnagiri (Maharashtra). Rainfall is continuing in Colaba, Santacruz and Goa: India Meteorological Department (IMD) pic.twitter.com/resS72Utq0
— ANI (@ANI) June 2, 2020
23:35 June 02
निसर्ग चक्रीवादळ; मुंबई अग्निशमन दल सज्ज
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ मुंबईत येत आहे. या वादळादरम्यान मोठा पाऊस पडून पाणी साचल्यास किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभातकुमार रहांगदळे यांनी दिली.
निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय पाणी साचणार्या ठिकाणीही आवश्यक पंप बसवण्यात आले आहेत. तसेच मुंबईच्या सहा चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्ड, रेस्क्यू बोट, जेट की आणि अग्निशमन दलाचे १५० फ्लड रेस्क्यू जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात ठेवण्यात आले आहेत.
22:42 June 02
१०९ मासेमारांना सुरक्षित स्थळी हलवले..
पालघर - समुद्रात असणाऱ्या १८ बोटींमधील १०९ मच्छिमारांना आयसीजीने सुरक्षित स्थळी हलवले आहे. आयसीजीच्या जहाजाने त्यांना समुद्रातून पालघरच्या बंदरावर आणून सोडले आहे.
22:40 June 02
निसर्ग चक्रीवादळ - राहुल गांधीनी दिला सतर्क राहण्याचा इशारा..
-
चक्रवाती तूफान निसर्ग कल महाराष्ट्र और गुजरात पहुँच रहा है। इस कठिन समय में, पूरा देश आपके साथ खड़ा है। अपना ख़्याल रखें।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सतर्क रहें, सुरक्षित रहें।https://t.co/3ypjQ1lRHn
">चक्रवाती तूफान निसर्ग कल महाराष्ट्र और गुजरात पहुँच रहा है। इस कठिन समय में, पूरा देश आपके साथ खड़ा है। अपना ख़्याल रखें।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2020
सतर्क रहें, सुरक्षित रहें।https://t.co/3ypjQ1lRHnचक्रवाती तूफान निसर्ग कल महाराष्ट्र और गुजरात पहुँच रहा है। इस कठिन समय में, पूरा देश आपके साथ खड़ा है। अपना ख़्याल रखें।

नवी दिल्ली - निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही तासांच्या अंतरावर येऊन ठपले आहे. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत लोकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे.
22:14 June 02
चक्रीवादळ अलीबागपासून २७० किलोमीटरवर; राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर पावसाला सुरूवात..
मुंबई - निसर्ग चक्रीवादळ हे अलीबागपासून २७० किलोमीटर दूर असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच राज्याच्या दक्षिण भागातील किनारपट्टीजवळील जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा जोर येत्या १२ तासांमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हे चक्रीवादळ उद्या (तीन जून) दुपारच्या सुमारास अलीबागला धडकेल, असेही सांगण्यात येत आहे.
21:15 June 02
वादळाच्या पार्श्वभूमीवर महसूल पोलीस प्रशासन सतर्क, 'एसडीआरएफ'ची दोन पथके तैनात..
वसई (पालघर) : निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन सतर्क झाले असून, १२ ग्रामपंचायतींना व महापालिकेतील, पाचू बंदर, ससुनवघर यांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. २९ शाळांमध्ये बाधितांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वसई-विरारच्या किनारपट्टीला असणाऱ्या अर्नाळा, कळंब राजोडी, पाचुबंदर, ससुनवघर, कामण या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून; कच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना परिसरातील शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.
20:42 June 02
रायगडमधील पाच हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले...
रायगड : निसर्ग चक्रीवादळ हे अलिबाग समुद्रकिनारी धडकणार असुम रायगडच्या समुद्र किनारपट्टीला याचा फटका पडणार आहे. चक्रीवादळा सोबत मुसळधार पाऊसही पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील पाच हजारहून अधिक समुद्रकिनारी गावातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, हॉल, समाजमंदिर याठिकाणी हलविण्यात आलेले आहेत. तर जिल्ह्यात एनडीआरएफची चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत.
19:16 June 02
दुपारनंतर समुद्रात लाटांचं रौद्र रुप
रत्नागिरी- कोकणच्या किनारपट्टीवर सध्या निसर्ग चक्रीवादळ घोंघावत आहे. रत्नागिरीत समुद्र खवळला असून अनेक भागात पावसाचा जोर तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. आज दिवसभराची तुलना करता वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे. शिवाय समुद्रच्या लाटा देखील आता किनाऱ्यावर धडकत आहेत. हळूहळू पाणी पातळी वाढत असून, पोलीस देखील किनारी भागात तैनात आहेत.
17:58 June 02
निसर्ग चक्रीवादळ अलिबाग समुद्रकिनारी धडकण्याची शक्यता
रायगड- निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी बसणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र, आता हे निसर्ग चक्रीवादळ अलिबाग समुद्रकिनारी येणार असून मुसळधार पाऊसही पडणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
17:46 June 02
पालघर आणि डहाणूमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि डहाणूमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले असून सतर्कतेचा इशार म्हणून मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
17:20 June 02
निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून 430 किमी अंतरावर
पुणे- मुंबईपासून निसर्ग चक्रीवादळ आता 430 किमी अंतरावर आहे. या चक्रीवादळाचे वारे ताशी 110 ते 120 वेगाने पुढे सरकत आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते. त्यामुळे मुंबई विशेषतः अलिबाग परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- निसर्ग वादळ मुंबईपासून 430 किमी अंतरावर
- 120 किमी प्रति तासाने वादळ धडकेल.
- वादळ किनारपट्टीवर पोहोचण्यास 11.30 तास लागतील.
- हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांची माहिती
16:56 June 02
पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यात उद्या सर्व उद्योग, दुकाने बंद
पालघर- निसर्ग चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील सर्व उद्योग, आस्थापना, दुकाने, ३ जून रोजी बंद ठेवण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
16:43 June 02
किनारपट्टीवर तटरक्षक दल तैनात
मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी किनारपट्टीवर एनडीआरएफसह तटरक्षक दलाला तैनात करण्यात आले आहे.
16:21 June 02
निसर्ग चक्रीवादळ येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर धडकणार
निसर्ग चक्रीवादळ येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर धडकणार. संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज
16:12 June 02
बीकेसी कोविड सेंटरमधील 242 कोरोना रुग्णांना वरळीत हलवले
मुंबई -उद्या मुंबईत मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसी एमएमआरडीए मैदानावरील कोविड सेंटरमधील 242 रुग्णांना वरळीतील एनएससीआय कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. बीकेसीचा परिसर मिठी नदी लगत येतो आणि हा सखल भाग म्हणून ओळखला जातो. साधारण पाऊस झाला तरी बीकेसीत पाणी साचते. आता चक्रीवादळाचा धोका असल्याने पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता या रुग्णांना येथून हलवण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे.
15:53 June 02
एनडीआरएफ टीम चिपळूणमध्ये दाखल...१८ जवानांसोबत २ अधिकाऱ्यांचा समावेश
चिपळूण (रत्नागिरी) -निसर्ग चक्रीवादळामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाची एनडीआरएफ टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. यामध्ये १८ जवानांसोबत २ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
15:49 June 02
एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये तैनात
पालघर - निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघरमध्ये एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये दाखल झाल्या असून एक तुकडी पालघर तर दुसरी तुकडी डहाणू तालुक्यात तैनात करण्यात आली आहे.
15:45 June 02
कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका
रत्नागिरी- निसर्ग चक्रीवादळ हळूहळू कोकण किनारपट्टीकडे सरकत असून मुंबईसह किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना या निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागाने जिल्हा प्रशासनांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. ज्या बोटी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेल्या होत्या त्यांना माघारी बोलावण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे(एनडीआरएफ) 26 जणांचे एक पथक चिपळूण येथे दाखल झाले आहे.
15:43 June 02
महाराष्ट्रात हायअलर्ट जारी, जुहू समुद्रकिनारी लाइफगार्ड तैनात
मुंबई -कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेल्या जनतेला बुधवारी निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरही मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने लाइफगार्ड तैनात केले आहेत. लॉकडाऊनमुळे समुद्रकिनारी बंदी असली तरी संपूर्ण सुरक्षेची खबरदारी पालिकेकडून घेण्यात आली आहे.
15:34 June 02
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
रायगड- निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी बसणार असे हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र आता हे निसर्ग चक्रीवादळ अलिबाग समुद्रकिनारी येणार असून मुसळधार पाऊस ही पडणार असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफचे दोन पथक आले असून अजून दोन पथके दाखल होणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यात 144 कलम लागू केले असून नागरिकांनी 3 जून रोजी बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
15:20 June 02
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफची टीम दाखल
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात एनडीआरएफची टीम दाखल झाली असून मालवण तारकर्ली येथे ही टीम तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीन प्रमुख बंदरात मच्छीमारी बोटी मोठ्या प्रमाणात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना तत्काळ मागे बोलाविण्यात आले. तर समुद्रात कोणीही जाऊ नये असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
15:06 June 02
येत्या 6 तासात तक्रीवादळात तीव्रता येण्याची शक्यता
येत्या 6 तासात निसर्ग चक्रीवादळाच्या वादळामध्ये तीव्रता येण्याची शक्यता आहे. 3 जून रोजी उत्तर महाराष्ट्र आणि हरिहेश्वर ते दमण दरम्यान दक्षिण गुजरात किनारपट्टी वरून दुपासच्या सुमारास अलिबाग (रायगड जिल्हा, महाराष्ट्र) च्या जवळ हे वादळ धडकण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
14:54 June 02
चक्रीवादळ निसर्ग मुंबईकडे सरकतेय
उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निसर्ग महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याचे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आज सांगितले आहे. येत्या 12 तासांत ते अधिक वेगवान आणि तीव्र होणार असून 3 जूनला ते मुंबईजवळ भूभागावर पोहोचण्याची शक्यताही आयएमडीने वर्तविली आहे.
14:52 June 02
खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या सहा तुकड्या पाचारण
अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ कोकण आणि मुंबईत धडकणार आहे. त्याअनुषंगाने खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या सहा तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. कोविड 19च्या पार्श्वभूमीवर जवानांना सुरक्षेचे सर्व साहित्य देण्यात आले आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
14:41 June 02
सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, महापालिका आयुक्तांचे आवाहन
मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा व सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबईतील सर्व रुग्णालयांनी जनरेटर कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक साधने जवळ बाळगावीत आणि वैयक्तिक स्तरावर देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
14:36 June 02
चक्रीवादळासाठी जनतेने घाबरुन जाऊ नये - विजय वडेट्टीवार
मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेतली आहे. सर्व विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
14:08 June 02
उद्या रत्नागिरीत संचारबंदी... चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
रत्नागिरी - चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता उद्या (बुधवार) संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी संबंधित आदेश काढला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली. या वादळामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी ०३ जूनला लोकांनी अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला.
14:07 June 02
संभाव्य चक्रीवादळ आपत्तीमुळे रायगडात रास्त भाव धान्य दुकाने राहणार बंद
रायगड - येथील किनारपट्टीवर 3 जूनला चक्रीवादळ धडकणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यादिवशी रास्त धान्य भाव दुकाने बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश काढले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत सर्व रास्त भाव धान्य तसेच केरोसीन दुकानदारांना सूचना दिल्या आहेत.
13:13 June 02
निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी
- निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी...
1) मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.
2) 3 जून 2020 रोजी कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
3)आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
4) घराच्या अवती-भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे.
5) आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
6) आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
7) हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
8) सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
9) आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.
10) पिण्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडिक्लोर मिसळावे.
11) मच्छीमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
12) अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी.
13) ग्रामकृती दलाच्या सूचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
14) सद्यस्थितीत जिल्ह्यात होम क्वारंटाइन असलेले नागरिक व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवताना एकमेकापासून सुरक्षित अंतरावर असतील, याची दक्षता घ्यावी.
15) मदत आवश्यक असल्यास आपली ग्रामपंचायत/तहसिलदार कार्यालय/ जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा.
13:02 June 02
तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान तसेच चेतक हेलिकॉप्टरमधून निरीक्षण
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रिवादळ पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाची स्थिती उपग्रहाद्वारे तपासली जात आहे. तसेच नौदल आणि तटरक्षक दलांच्या डॉर्नियर विमानानेही याची पाहणी केली जात आहे.
अरबी समुद्रातील परिस्थितीवर तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान तसेच चेतक हेलिकॉप्टरमधून सतत निरीक्षण केले जात आहे. तसेच खोल समुद्रात कोणी मासेमारी करणारी बोट आढळल्यास तत्काळ समुद्रात गस्त घालणाऱ्या तटरक्षक दलांच्या बोटींना कळवलेही जात आहे.
नौदलाचेही 'सी किेग' हेलिकॉप्टर सध्या अरबी समुद्रात आपत्कालिन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या बरोबरच नौदलातर्फे अरबी समुद्रात मदतीसाठी 5 जेमिनी बोटी तैनात करण्यात आल्या असून राज्य शासनाच्या सूचनेनुसार हवी ती मदत नौदलातर्फे करण्यात येणार आहे. तटरक्षक दलातर्फे खोल समुद्रात गेलेल्या मच्छीमारी करणाऱ्या बोटींना सूचना देऊन तत्काळ सुमद्रकिनारी पोहोचण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
निसर्ग चक्रीवादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छीमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
12:17 June 02
मुंबई - महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ ३ जूनला पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून समवेत जोरदार पाऊस देखील कोसळू शकतो.
निसर्ग वादळाचा तडाखा बसून हानी होऊ नये, याचे नियोजन सरकार करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. निसर्ग वादळाचा सामना करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. चक्रीवादळाचा तडाखा ज्या परिसरात बसणार आहे, त्या परिसरातील नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासह मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याविषयी अलर्ट करण्यात आले आहे. चक्रीवादळाचा तडाखा मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना बसणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाला अलर्ट करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे.