ETV Bharat / state

Raj Kundra : राज कुंद्राविरोधात सायबर पोलिसांकडून आरोप दाखल; आर्थिक मोबदल्यासाठी अश्लील व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात ( cyber police filed Charge sheet against Kundra ) आले. दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओ शूटकरून ( obscene video shoot in five star hotel ) यामधून आर्थिक मोबदल्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ प्रसारित केल्याचे त्यांनी आरोप पत्रात म्हटले आहे.

Raj Kundra
राज कुंद्रा
author img

By

Published : Nov 20, 2022, 10:23 AM IST

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील व्हिडिओ निर्मिती प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात ( cyber police filed Charge sheet against Kundra ) आले. या आरोप पत्रात असे म्हटले आहे की मुंबईतील उपनगरातील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओ शूटकरून ( obscene video shoot in five star hotel ) यामधून आर्थिक मोबदल्यासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ प्रसारित केले होते. असे मुंबई सायबर सेलने आरोप पत्रात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी 450 पानाचे आरोप पत्र मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले आहे.

हॉटेल्समध्ये अश्लील व्हिडिओ शूट : या आरोप पत्रामध्ये मुंबई पोलिसांनी असे म्हटले आहे की उद्योगपती राज कुंद्रा, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे आणि चित्रपट निर्माती मीता झुनझुनवाला आणि कॅमेरामन यांनी एकमेकांशी संगनमत करून उपनगरातील दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये अश्लील पोर्न व्हिडिओ शूट केले होते हे व्हिडिओ आर्थिक मोबदल्यासाठी विविध OTT प्लॅटफॉर्मवर संगणमताने प्रसारित केली होते ( Video broadcast on OTT platform ) असे आरोपपत्रात म्हटले आहे.

अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला : पोलिसांनी सांगितले की आर्मस्प्राईम मीडिया लिमिटेडचे ​​संचालक कुंद्रा अश्लील व्हिडिओंच्या निर्मिती ( Raj Kundra Obscene Video Case ) आणि वितरणात गुंतले होते. 2019 मध्ये काही वेबसाइट्स इंटरनेटवर अश्लील सामग्री अपलोड करत असल्याची तक्रार कस्टम आणि सेंट्रल एक्साइज ऑफिसरने नोंदवल्यानंतर सायबर पोलिसांनी कलम 292 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे, कॅमेरामन राजू दुबे, झुनझुनवाला, बनाना प्राइम ओटीटी संचालक सुवाजित चौधरी, आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे राज ​​कुंद्रा आणि त्याचा कर्मचारी उमेश कामत यांच्याविरुद्ध 450 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.आरोप पत्रामध्ये पोलिसांनी पूनम पांडेचे नाव दिले आहे. शर्लिन चोप्राचे अश्लील व्हिडिओ विविध OTT प्लॅटफॉर्मवर अपलोड रिलीझ केलेले आढळले आहेत. बनाना प्राइम-द ओटीटी प्लॅटफॉर्मचे डायरेक्टर सुवाजित चौधरी यांच्यावर प्रेम पगलामी या वेब सीरिजची निर्मिती आणि त्यांच्या ओटीटीवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.

स्वतःचे मोबाइल अ‍ॅप विकसित : आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे की पूनम पांडे हिने कुंद्राच्या कंपनीच्या मदतीने स्वतःचे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आणि तिचे अश्लील व्हिडिओ उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये शूट केले नंतर अपलोड केले. आरोपी कॅमेरामन राजू दुबे याने चोप्राचे व्हिडिओ शूट केले हे जाणून ते गुन्हा आहे. चित्रपट लेखिका आणि निर्माती मीता झुनझुनवाला, आर्म्स प्राइमचे बिझनेस हेड आणि सेलिब्रेटी मॅनेजमेंट यांनी चोप्रासाठी कथा दिग्दर्शन आणि स्क्रिप्टिंगमध्ये मदत केली होती. त्याचप्रमाणे मॉडेल पूनम पांडेने आर्मस्प्राईमसोबत व्यवसाय करार केला तिचे स्वतःचे मोबाइल अ‍ॅप द पूनम पांडे बनवले आहे त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील मजकूर अपलोड केला आहे. आर्मस्प्राईम कंपनीला या सर्व आरोपींकडून आर्थिक फायदा झाला त्यामुळे कंपनीने गुन्ह्यात मदत केली असे आरोपपत्रात म्हटले आहे. पोलिस अशा काही मॉडेल्सचा शोध घेत आहेत ज्यांनी पॉर्न फिल्म्स वेब सिरीजमध्ये काम केले पण गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार झाले आहेत. कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी यांच्या यूकेमध्ये नोंदणीकृत कंपनी केनरिनच्या मालकीच्या लंडनस्थित कंपनी-हॉटशॉटचे व्यवस्थापक उमेश कामत यांच्यावरही पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण : राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.