ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात राज्यात 516 गुन्हे दाखल, 273 जणांवर अटकेची कारवाई - राज्यातील सायबर गुन्ह्यात वाढ बातमी

लॉकडाऊनकाळात राज्यभरात विवादास्पद वॉट्सअप पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 197 गुन्हे, फेसबुक पोस्टप्रकरणी 215 गुन्हे, टिकटॉक व्हिडिओ शेअरप्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 11 गुन्हे, इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, ऑडिओ क्लिप, युट्युबसारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 61 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन काळात राज्यात 516 गुन्हे दाखल
लॉकडाऊन काळात राज्यात 516 गुन्हे दाखल
author img

By

Published : Jul 3, 2020, 8:51 PM IST

मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून कोरोनाला घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी सोशल माध्यमांवर काही असामाजिक तत्त्व परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न सध्या केला जात असल्यामुळे अशा समाजकंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 516 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 216 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

लॉकडाऊनकाळात राज्यभरात विवादास्पद वॉट्सअप पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 197 गुन्हे, फेसबुक पोस्टप्रकरणी 215 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, टिकटॉक व्हिडिओ शेअरप्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 11 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, ऑडिओ क्लिप, युट्युबसारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 61 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हावार दाखल सायबर गुन्ह्यांची नोंद -

राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 54 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 45, जळगाव 35, मुंबई 29, नाशिक ग्रामीण 18, कोल्हापूर 17, सांगली 17, बुलढाणा 15, ठाणे शहर 15, सातारा 14, जालना 14, नांदेड 13, नवी मुंबई 13, नाशिक शहर 13, अहमदनगर 13, ठाणे ग्रामीण 13, पालघर 11, लातूर 11, नागपूर शहर 11, परभणी 9, सिंधुदुर्ग 8, हिंगोली 8, अमरावतीं 8, चंद्रपूर 8, गोंदिया 6, सोलापूर ग्रामीण 5, पुणे शहर 5, रत्नागिरीत 5, सोलापूर शहर 5, नागपूर ग्रामीण 5, भंडारा 4, पिंपरी-चिंचवड 4, अमरावती ग्रामीण 4, धुळे 4, वर्धा 3, रायगड 2, वाशीम 2, नंदुरबार 2, उस्मानाबाद 2, औरंगाबाद 2, यवतमाळ 1, अकोला 3, औरंगाबाद ग्रामीण 1 एवढे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.