ETV Bharat / state

आचारसंहितेच्या काळात सोशल माध्यमांवर सायबर सेलची करडी नजर - सायबर सेल

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काही राजकीय नेत्यांकडून प्रतिस्पर्ध्यांबाबत समाज माध्यमांवर विविध अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर राज्यातील सायबर सेल करडी नजर असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सायबर सेलचे अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी दिली.

बालसिंग राजपूत
author img

By

Published : Sep 26, 2019, 8:21 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून लवकरच विविध राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत. अशातच प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून साम, दाम, दंड, भेदचा वापर करून निवडणुकीत उभे राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. आचारसंहितेच्या काळात आपल्या प्रतिस्पर्धकांवर कुरघोडी करण्यासाठी बऱ्याच वेळा प्रचाराच्या नावाखाली समाज माध्यमांचा वापर करत प्रत्येक पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ता हे एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना दिसतात. या सर्व गोष्टींचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये, म्हणून राज्याच्या सायबर सेलकडून योग्य खबरदारी घेतली जात आहे.

माहिती देताना बालसिंग राजपूत

विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे सायबर सेल सज्ज झाले असून आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांवर सायबर सेलची करडी नजर असणार आहे. निवडणुकीच्या काळात प्रचार करताना सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक समाजात, गटात, धर्मात वाद निर्माण करणे किंवा निवडणुकीच्या कार्यप्रणालीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या अनुषंगाने सायबर सेल समाज माध्यमांच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. यासंदर्भातील प्रत्येक दिवशीचा आढावा निवडणूक आयोगाला सायबर सेलकडून दिला जात आहे.

हेही वाचा - पीएमसी संचालक मंडळातील ९ जण भाजपचे, तेव्हाच लूट झाली - संजय निरुपम

यासाठी सायबर सेलकडून राज्यस्तरावर एक नोडल कार्यालय बनविले गेले असून सायबर सेलच्या विशेष कंट्रोल रूमच्या माध्यमातून समाज माध्यमांवरील असामाजिक तत्वांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. निवडणुकी दरम्यान सोशल माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.

Intro:राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजके असून लवकरच विविध राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांना तिकीट फील जाणार आहे.अशातच प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवारांना आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून साम दाम दंड भेद चा वापर करून निवडणुकीत उभे राहण्याचा प्रयत्न असणार आहे. आचारसंहितेच्या काळात आपल्या प्रतिस्पर्धकांवर कुरघोडी करण्यासाठी बऱ्याच वेळा प्रचार च्या नावाखाली सोशल माध्यमांचा वापर करीत प्रत्येक पक्षाचे उमेदवार , कार्यकर्ता हे एकमेकांवर राजकीय चिखलफेक करताना दिसतात . या सर्व गोष्टींचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये म्हणून राज्याच्या सायबर सेल कडून योग्य खबरदारी घेतली जात आहे.
Body:विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे सायबर सेल सज्ज झाले असून आचारसंहितेच्या काळात सोशल माध्यमांवर सायबर सेल आपले बारीक लक्ष ठेवून असणार आहे . निवडणुकीच्या काळात प्रचार करताना सोशल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो आणि या सोशल माध्यमांमधून दोन समाज , धर्म वाद निर्माण करणे किंवा निवडणुकीच्या कार्यप्रणालीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो .या अनुषंगाने सायबर सेल सोशल माध्यमांच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे . यासंदर्भातील प्रत्येक दिवशी चा आढावा निवडणूक आयोगाला सायबर सेल कडून दिला जात आहे.Conclusion: यासाठी सायबर सेल कडून राज्यस्तरावर एक नोडल कार्यालय बनविले गेले असून सायबर सेल च्या स्पेशल कंट्रोल रूम च्या माध्यमातून सोशल माध्यमांवरील असामाजिक तत्वांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. निवडकी दरम्यान सोशल माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.

( बाईट - बालसिंग राजपूत , एसपी , सायबर सेल महाराष्ट्र )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.