ETV Bharat / state

शिवडी रेल्वे स्थानकालगतची 1004 झाडे तोडण्याची नोटीस; पर्यावरण प्रेमीचा तीव्र विरोध - पर्यावरण प्रेमी रुपेश ढेरंगे

ट्रान्स हार्बर प्रकल्पासाठी शिवडी रेल्वे  स्थानकालगत सुमारे 1004 झाडे कापण्यासाठी महापालिकेने नोटीस लावली आहे. या वृक्षतोडीला स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. यासाठी त्यांनी स्वाक्षरी करून  रेल्वे प्रशासन, पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांसह आमदारांना झाडे कापू नये यासाठी पत्र लिहिले आहे.

शिवडी रेल्वे स्थानकालगत 1004 झाडांवर लागली झाड तोडण्याची नोटीस
author img

By

Published : Aug 16, 2019, 6:26 PM IST

मुंबई - ट्रान्स हार्बर प्रकल्पासाठी शिवडी रेल्वे स्थानकालगत सुमारे 1004 झाडे कापण्यासाठी महापालिकेने नोटीस लावली आहे. या वृक्षतोडीला स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. यासाठी त्यांनी स्वाक्षरी करून रेल्वे प्रशासन, पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांसह आमदारांना झाडे कापू नये यासाठी पत्र लिहिले आहे.

शिवडी रेल्वे स्थानकालगत 1004 झाडांवर लागली झाड तोडण्याची नोटीस

मुंबईत यापूर्वी आरे येथील कार्षेड प्रकल्पासाठी 2200 झाड तोडण्यासाठी परवानगी मागितली गेली होती. परंतु, नागरिकांनी हरकत दर्शवल्यानंतर पालिकेने ही झाडे तोडण्यास स्थगिती दिलेली आहे. त्यानंतर, आठ ऑगस्ट रोजी शिवडी स्थानकातील झाडं तोडण्याची सूचना पालिकेने झाडांवर लावली आहे.

नैसर्गिक संपत्ती नष्ट करून आभासी प्रकल्प कशासाठी, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारत आहेत. जर झाडे तोडली गेली किंवा तोडायला आले तर शिवडी येथील स्थानकात रेल्वे रोको आणि पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण प्रेमी रुपेश ढेरंगे यांनी दिला आहे.

Intro:शिवडी रेल्वे स्थानकालगत 1004 झाड तोडण्याची झाडांवर नोटीस ; पर्यावरण प्रेमी व नागरिकांचा याला विरोध

mh_mum_shivdi_station_tree_cut_notice_people_againts_01_7205017

मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पासाठी शिवडी स्थानकात रेल्वे लगेच सुमारे 1400 कापण्यासाठी महानगरपालिकेने नोटीस लावलेली आहे .या वृक्षतोडी बद्दल शिवडी स्थानकातील रहिवाशी व पर्यावरण प्रेमी यांना याचा विरोध आहे .याला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक व पर्यावरणप्रेमी संघटना झाड कापण्यासाठी विरोध करत आहेत. त्यांनी यासाठी रेल्वे पालिका नगरसेवक आमदार यांना ही झाडं कापू नये यासाठी लोकांच्या स्वाक्षरी घेऊन पत्र लिहिले आहे. नैसर्गिक संपत्ती नष्ट करून आभासी प्रकल्प कशासाठी असे स्थानिक लोक व पर्यावरण प्रेमी विचारत आहेत .जर झाड तोडली गेली किंवा तोडायला आले तर शिवडी येथील स्थानकात रेल्वे रोको आंदोलन किंवा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे पर्यावरण प्रेमी रुपेश ढेरंगे यांनी सांगितले.

मुंबईत यापूर्वी आरे येथील कार्षेड प्रकल्पासाठी बावीसशे झाड तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु लोकांनी हरकती दर्शविल्यानंतर पालिकेने हि झाडे तोडण्यास स्थगिती दिलेली आहे .त्यामध्ये आत्ता नुकतंच आठ ऑगस्ट रोजी केंद्रातील हार्बर लींक प्रकल्पासाठी शिवडी स्थानकातील हीच 1004 झाडं तोडण्याची सूचना पालिकेने झाडांवर लावलेली आहे .ही नोटीस पहाताच येथील नागरिक व पर्यावरण प्रेमी आश्चर्यचकित झाले. उन्हातून थकून-भागून आल्यानंतर या झाडाखाली लोकं विश्रांती घेतात. त् तसेच ऑक्सिजन पुरवठा करणारी झाडे आपल्याला मदत करतात. अशा मुंबईतील नैसर्गिक संपत्ती हळूहळू आभासी प्रकल्प उभारण्यासाठी नष्ट होत आहेत . त्यामुळे एक दिवस मोठी आपत्ती ओढावणार आहे .यासाठी लोक जी नोटीस लावलेली आहे त्याला विरोध करत आहेत व ही झाडे तोडू देणार नाही असे सांगत आहेत.

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.