ETV Bharat / state

१० रुपयांचा वाद जीवावर बेतला; भाजी चिरायच्या चाकूनेच कापला गळा

भाजविक्रेत्याने रागाच्या भरात ग्राहकावर चाकून वार केले. यामध्ये ग्राहकाचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळावरील दृश्य
author img

By

Published : Jun 25, 2019, 1:21 PM IST

Updated : Jun 25, 2019, 1:45 PM IST

मुंबई - रस्त्यावर भाजी विक्रेत्यासोबत केवळ १० रुपयांच्या वादातून ग्राहकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा दादर परिसरात घडली. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या मानेवर आणि हातावर वार केले. त्यामध्ये ग्राहकाचा मृत्यू झाला.

शिवाजी पार्क पोलीस ठाणे

मोहम्मद हमीद असे मृत ग्राहकाचे नाव आहे. हमीद सोमवारी रात्री दादर परिसरात भाजी घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आरोपी सोनीलालकडून भाजी खरेदी केली. यावेळी फक्त १० रुपये देण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान सोनीलालने रागाच्या भरात त्याच्याजवळील चाकून हमिदच्या मानेवर आणि हातावर वार केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

हे वाचलंत का? - औरंगाबाद : जमिनीच्या वादातून ३ साडूंमध्ये जोरदार हाणामारी; एकाचा मृत्यू

परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या हमीदला केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

Intro:मुंबईतील दादर परिसरात रस्त्यावर भाजी विक्रेत्या सोबत ग्राहकाची केवळ 10 रुपायांवरून वाद होऊन भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या मानेवर व हातावर वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. या प्रकरणी भाजी विक्रेता सोनीलाल याला अटक करण्यात आदी असून मोहमद हमीद या ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. Body:सोमवारी रात्री उशिरा मोहमद हनिफ ही व्यक्ती दादर परिसरात भाजी घेण्यासाठी आरोपी सोनीलाल याच्याकडे आला होता. भाजी घेताना केवळ 10 रुपये देण्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन याचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान रागाच्या भरात आरोपी सोनीलाल याने त्याच्याकडील चाकूने मयत हनिफ याच्या मानेवर व हातावर वार केले. आरोपी सोनीलाल याने यानंतर जागेवरुन पळ काढला , जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या हनिफ याला स्थानिकांनी केईएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी हनिफ यास मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवीत तात्काळ आरोपीला अटक केली आहे. Conclusion:
Last Updated : Jun 25, 2019, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.