मुंबई : मुंबईत फसवणुकीचे गुन्हे हे नेहमीच घडत असतात. अनेकदा या घटनांमध्ये प्रसिद्ध, प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याचेही दिसते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका करणाऱ्या साईशा भोईर हिची आई पूजा भोईर हिने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कफ परेड रोड पोलिसांनी कल्याणमधील त्यांच्या घरात छापेमारी करत पूजा भोईरला अटक केली आहे. साईशा रंग माझा वेगळा, नवा गडी नवं राज्य या मालिकांमध्ये काम करते.
मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात : मुंबईत कुलाबा परिसरात राहणारे मयुरेश पत्की यांची पत्नी नेहा हीची 2022 दरम्यान पूजा भोईर या नावाच्या महिलेची ओळख झाली होती. पूजा भोईर यांची मुलगी साईशा ही बालकलाकार आहे. तिचा अभिनय चांगले असल्यामुळे तो नेहाला आवडला. पत्की यांची पत्नी नेहा साईशाला फॉलो करत होती. साईशा भोईर या नावाने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तिचे अकाउंट होते. परंतु साईशाचे अकाउंट तिची आई म्हणजेच पूजा भोईर ही वापरत होती. नंतर इंस्टाग्रामवर नेहा पत्की यांनी तिचा मोबाईल क्रमांक पूजा भोईरला दिला. दोघी मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात राहिल्या. पूजा आणि नेहा यांची फोनवर चांगलीच मैत्री झाली होती.
'अशी' घडली घटना : पूजा भोईर ही अल्गो ऑप्शन्स स्ट्रेटरी मॉडेल्स नावाने गुंतवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे तक्रारदार यांच्या पत्नीला सांगितले. तसेच केलेल्या गुंतवणुकीवर आठवड्यास दहा-दहा टक्के नफा मिळून देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. गुंतवणुकीची रक्कम परत मिळेल, याची हमी देऊन नेहा हिला अल्गो ऑप्शन्स स्ट्रेटरी यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर नेहा पत्कीने पूजा भोईरच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर सहा लाख रुपये टाकले. असे करता करता पुढे तिने दहा लाख रुपये गुंतवणूक केली. काही दिवस आठवड्याचा परतावा मिळाला. मात्र, नंतर हा परतावा देण्यास पूजाने टाळाटाळ केली. परताव्याचा चेक देखील तिने दिला होता. मात्र भोईर हिने दिलेला चेक बाऊन्स झाला. याबाबत तक्रारदार यांनी पुजाला विचारले असता तिने तक्रारदाराला आरेरावीचे उत्तर दिले.
हेही वाचा :
- Cyber Fraud In Pune: युट्यूबवरुन दिले शेअर मार्केटचे धडे, लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थानहून अटक
- DRDO Honey Trap: कुरुलकरने हनी ट्रॅपमध्ये अडकून महिलेसोबत पाहिली मॅच अन् विदेशातील डान्स बारमध्ये लुटली मजा
- Crime News : सोने पडले महागात; बनावट कस्टम अधिकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला घातला ३.६ लाखांचा गंडा