ETV Bharat / state

'सीआरपीएफ' मुंबई कार्यालयात बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा मेल; शाह, योगींना धोका - threatening e-mail

सीआरपीएफच्या कार्यालयामध्ये अज्ञात व्यक्तीकडून धमकी देणारा मेल पाठविण्यात आला असून, या ईमेलच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी मंदिरे व विमानतळावर बॉम्ब स्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे.

'सीआरपीएफ'च्या मुंबई कार्यालयात धमकीचा मेल

author img

By

Published : Apr 6, 2021, 2:26 PM IST

Updated : Apr 6, 2021, 3:42 PM IST

मुंबई - सीआरपीएफच्या कार्यालयामध्ये अज्ञात व्यक्तीकडून धमकी देणारा मेल पाठविण्यात आला असून, या ईमेलच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी मंदिरे व विमानतळावर बॉम्ब स्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेल 4 ते 5 दिवसांपूर्वी आल्याचे सीआरपीएफच्या सूत्रांकडून कळत आहे.

सीआरपीएफ'मध्ये धमकीचा मेल

हेही वाचा - अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?

देशातील 3 राज्यात 200 आरडीएक्स असल्याचा दावा
सीआरपीएफच्या कार्यालयात आलेला हा मेल तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा व इतर गुप्तचर यंत्रणांना देण्यात आला आहे. सदरच्या मेलमध्ये भारतातील लष्कर-ए-तोयबाच्याच्या स्लिपर सेलच्या एजंटचा उल्लेख करण्यात आला आहे. या मेलमध्ये देशातील तीन राज्यांमध्ये जवळपास दोनशे किलो आरडीएक्स असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - उत्तर प्रदेशचे 'स्पेशल १००' पोलीस पंजाबला पोहोचले; मुख्तार अन्सारीला आणणार परत

आमचे 11 पेक्षा अधिक आतंकवादी व सुसाईड बॉम्बर सध्या सतर्क असून, गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचे या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. आम्ही अज्ञात आहोत, आम्ही एक आर्मी आहोत, आम्ही माफ करत नाही, आम्ही विसरत नाही, आमची वाट पहा असा मजकूर त्यांनी या मेलमध्ये दिला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कंट्रोल रूम मला असाच एक कॉल निनावी पद्धतीने आलेला होता. जो पाकिस्तानच्या कराची शहरातून कॉल केला गेला असल्याचा दावा करण्यात आला होता . मुंबईतील बंदर व पोलीस आस्थापनांवर हल्ल्याची धमकी या फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात आलेली होती.

Last Updated : Apr 6, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.