ETV Bharat / state

Diwali Shopping : दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग; महागाईमुळे खरेदीदारांवर परिणाम

author img

By

Published : Oct 16, 2022, 3:44 PM IST

मुंबईत दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरु झाली ( Crowd of citizens for Diwali shopping ) आहे. मश्चिद बंदर, कॉफर्ड मार्केट, दादर, हिंदमाता, वांद्रे, कुर्ला आदी बाजारपेठा गजबजून निघाल्या आहेत. खरेदीसाठी मोठी झुंडब उडाली आहे. सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत तुफान गर्दी वाढते. कोरोनानंतरची पहिली दिवाळी असली तरी महागाईमुळे खरेदीदारांवर मोठा परिणाम होतो ( Diwali shopping Impact On Buyers ) आहे.

Diwali Shopping
दिवाळी खरेदी

मुंबई - मुंबईत दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरु झाली ( Crowd of citizens for Diwali shopping ) आहे. मश्चिद बंदर, कॉफर्ड मार्केट, दादर, हिंदमाता, वांद्रे, कुर्ला आदी बाजारपेठा गजबजून निघाल्या आहेत. खरेदीसाठी मोठी झुंडब उडाली आहे. सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत तुफान गर्दी वाढते. कोरोनानंतरची पहिली दिवाळी असली तरी महागाईमुळे खरेदीदारांवर मोठा परिणाम होतो ( Diwali shopping Impact On Buyers ) आहे.

खरेदीदारांवर परिणाम

साफसफाईची लगबग सुरू - दिवाळी' हा शब्द उच्चारला, तरी आपल्या अंगात उत्साह संचारतो, मन हर्षोल्हासित होते. नवी खरेदी, फराळाचे नानाविध पदार्थ, रांगोळी-रोषणाई, भेटवस्तू आणि आनंदी आनंद अशा वातावरणाची आस आपल्याला लागते. घरातील साफसफाईची लगबग सुरू होते. यंदा २३ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला नरकासूर वध व सायंकाळी लक्ष्मीपूजन तर २६ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज आहे. या निमित्तीने दिवाळी धूम राज्यभरात पहायला मिळणार आहे. मुंबई सारख्या शहरांत दिवाळीत खरेदीचे हमखास ठिकाण म्हणजे, दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट. खरेदीदारांची मोठी गर्दी असलेली महत्त्वाची बाजारपेठ आहे. क्रॉफर्ड मार्केट परिसरात प्रामुख्याने घाऊक विक्रेते आहेत. परंतू दिवाळीसाठी लागणारा सुका मेवा, आकाश दिवे, रोषणाईचे साहित्य परवडणाऱ्या दरात येथे मिळतात. त्यामुळे खरेदीसाठी इकडे चांगली गर्दी असते. त्यामुळे येथील दुकानातही चांगली गर्दी आहे.

तोरण आणि कंदील - दक्षिण मुंबईतील लोहार चाळ येथे वेगवेगळ्या प्रकारचे कंदील, इलेक्टिक तोरण तसेच सजावटीच्या साहित्य ( Diwali shopping Of Electric Lantern ) मिळतात. छोटी मोठी इलेक्ट्रॉनिकची दुकाने मोठ्या संख्येने येथे आहेत. अत्यंत कमी दरात कंदीलांची विक्री ( Lanterns Sale At Low Prices ) होते. सध्या बाजारात झुंबर, तोरणे, स्लावर, रिंग बॉल असे वेगळे प्रकार आले आहेत. सत्तर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दिवाळीला दहा दिवस बाकी आहेत. गिऱ्हाईक यायला सुरुवात झालेली नाही. गणपतीला बऱ्यापैकी गिऱ्हाईक होते, असे सदगुरु कृपा दुकानांचे मालक मनोज डिसले यांनी सांगितले.

गोंड्यांच्या माळांना मागणी - दिवाळीत गोंड्यांची माळ खरेदीला मोठी मागणी असते. बाजारात प्लास्टिक पासून बनलेले तोरण, फुलांच्या वेगवेगळ्या माळा उपलब्ध आहेत. अगदी कमीत कमी दोनशे रुपयांपासून तोरण आहेत. अठराशे रुपयांपासून चार ते पाच हजार रुपयांपर्यंत हार मार्केटमध्ये आले आहेत. आंब्याच्या पानांची तोरण ही बाजारात आहेत, असे हरीष सावंत यांनी सांगितले. बाजारात बऱ्यापैकी तोरण, फुलांना मागणी आहे, असे सावंत म्हणाले.

पणत्या, रांगोळी - दिवाळीचे सजावटीच्या वस्तू- पणत्या, रांगोळी तसेच सजावटीच्या विविध वस्तू शिवाय दिवाळी अपूर्णच असते. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी इकोफ्रेंडली वस्तूंना जास्त प्रमाणात प्राधान्य दिले आहे. टिकल्या, घुंगरु, काच, चकाकणारी चमकी अशा सजावटींच्या वस्तू वापरुन बनवलेल्या डिझायनर पणत्यांना बाजारात जास्त आवक आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक लाल मातीपासून तयार केलेल्या पणत्यांची आवड अजूनही कायम आहे. बाजारात 10 रुपयांपासून ते 250-300 रुपयांपर्यंतचे दिवे विक्रीसाठी आले आहेत. त्याशिवाय रांगोळी काढण्यासाठी वेळ न मिळणा-या गृहिणींसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे साचे बाजारात आले आहेत. यंदा भेलेश्वर मार्केटमध्ये पणत्या आणि रांगोळी कमी भावात आहेत. खरेदीसाठी मुंबईकरांची मोठी झुंबड उडाली आहे.

कागदी कंदीलांची मागणी - विविध रंगांचे, आकारातील, कागदी, कापडी व प्लास्टिकमधील आकाश कंदील बाजारात आले आहेत. पूर्वी हाताने तयार केलेले आकाश कंदील आता रेडीमेड बनवलेले घेण्यास ग्राहकांची पसंती आहे. तयार वस्तूंची मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी दुकानातून तशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यास सुरुवात केली आहे. आकाश कंदील कमीत कमी ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. दुप्पट दर वाढले आहेत. कोरोना पूर्वी चांगला धंदा होता. मात्र, सध्या मार्केटचे दिवस खराब आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन निघत नाही. गिऱ्हाईक घासाघीस करतात. साहित्य विकताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, असे कंदील विक्रेते गुड्डू भाई यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.