ETV Bharat / state

तब्बल ८ लाखांहून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई, कोट्यवधीचा दंड वसूल

वाहतूक विभागाकडून वाहन चालकांसाठी नवीन दंड नियमावली लागू करण्यात आली असून दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे. तरीही वाहन चालकांकडून सर्रासपणे वाहतूक नियम मोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दुचाकी वाहन चालक हेल्मेट आणि चारचाकी चालकांकडून सीटबेल्टचा वापर होत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने राज्यभरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाखांहून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर, तर ३ लाखांहून अधिक चारचाकी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यातून कोट्यवधींचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.

author img

By

Published : Apr 27, 2022, 9:42 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - वाहतूक विभागाकडून वाहन चालकांसाठी नवीन दंड नियमावली लागू करण्यात आली असून दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे. तरीही वाहन चालकांकडून सर्रासपणे वाहतूक नियम मोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दुचाकी वाहन चालक हेल्मेट आणि चारचाकी चालकांकडून सीटबेल्टचा वापर होत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने राज्यभरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाखांहून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर, तर ३ लाखांहून अधिक चारचाकी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यातून कोट्यवधींचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.

४३ कोटीपेक्षा जास्त दंड - राज्यात दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुचाकींची संख्या वाढण्यासाेबतच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने दंडाची रक्कम वाढवली आहे. तरीही वाहन चालकांकडून सर्रासपणे वाहतूक नियम मोडण्यात येते. वाहतूक विभागाच्या नियमाप्रमाणे दुचाकीस्वार आणि दुचाकीस्वारामागे बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. तरीही मोठ्या प्रमाणात नागरिक विना हेल्मेट वाहन चालवताना दिसून येत आहे. परिणामी वाहतूक विभागाने विना हेल्मेट वाहन चालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. राज्यातील वाहतूक विभागाने जानेवारी ते मार्च, २०२२ या काळात राज्यभर केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख ८० हजार २६२ दुचाकीस्वार व त्यामागे बसलेल्या प्रवाशांना विनाहेल्मेट प्रकरणी दंड ठोठावला आहे. यातून तब्बल ४३ कोटी ९७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सीटबेल्ट न लावणाऱ्यांविरोधात कारवाई - रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सीट बेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या चारचाकी वाहनांच्या अपघातात वाहन चालक आणि सहप्रवाशाकडून सीटबेल्टचा वापर होत नसल्याने अपघाती मृत्यूंची संख्या वाढल्याचा निष्कर्ष वाहतूक प्रशासनाच्या सर्वेक्षणात समोर आला होता. त्यामुळे सीटबेल्ट लावण्यात कंटाळा करणाऱ्या २ लाख ८८ हजार ६५ चालकांवर आणि ४६ हजार ४६० सह प्रवाशांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. यातून तब्बल 5 कोटी 85 लाख 20 हजार 120 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय गेल्या महिन्यात शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांपासून हेल्मेटचा वापर वाढावा म्हणून शासकीय कार्यालयांबाहेर विनाहेल्मेट कारवाईचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षांत तीन हजारपेक्षा जास्त मृत्यू - गेल्या काही वर्षांत दुचाकीस्वारांचे अपघात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हे अपघात कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी अनेकदा हेल्मेटसक्ती केली होती. याशिवाय दंडात्मक कारवाईही करण्यात आली. मात्र, तरीही अनेक वाहनचालक दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करत नाही. यापूर्वी 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' ( No Helmet, No Petrol ) सारखे अभियान वाहतूक पोलिसांकडून चालविण्यात आले होते. विशेष म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांना परवाना रद्दही करण्यात आलेला आहे. तरीही दुचाकी वाहनांचे अपघात कमी झाले नाही. २०१९ आणि २०२० मध्ये राज्यात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट न घातल्याने तीन हजार १५६ सहप्रवाशांना मृत्यूला सामाेरे जावे लागले आहे.

हेही वाचा - Million fines on motorists : मुजोर वाहन चालकांची नोटीसांना केराची टोपली; एक हजार कोटींचा दंड थकवला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.