ETV Bharat / state

University Vice Chancellor: गुन्हे दाखल असलेले व्यक्ती कुलगुरू पदाचे उमेदवार म्हणून कसे निवडले? मुंबई विद्यापीठ कॉलेज टीचर असोसिएशनचे राज्यपालांना पत्र - पराग काळकर

राज्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोण होणार? याबाबत अत्यंत चुरशीची चढाओढ सुरू आहे. शासनाने याबाबत पाच नावे उमेदवार म्हणून निवडलेली आहेत. त्यापैकी एका उमेदवारावर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर दुसऱ्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू आहे. कुलगुरुपदी गुन्हे दाखल व्यक्तींना उमेदवार म्हणून कसे निवडण्यात आले, असा प्रश्न करत मुंबई विद्यापीठ कॉलेज टीचर असोसिएशनने उमेदवारांच्या निवडीला विरोध केला आहे. मुंबई युनिव्हर्सिटी टीचर असोसिएशनने राज्यपालांना त्याबाबत आक्षेप घेणारे पत्र पाठवले आहे.

University Vice Chancellor
विद्यापीठाचे कुलगुरू
author img

By

Published : May 21, 2023, 2:21 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्न ६०० ते साडेसहाशे महाविद्यालय आहेत. ज्यामध्ये सर्व प्रकारचे आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जातात. मुंबई विद्यापीठाचा मोठा पसारा पसरलेला असताना या नामांकित आणि प्रख्यात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. मात्र त्यामध्ये एक उमेदवार असे आहेत ज्यांनी विद्यापीठाचा पैसा स्वत: साठी वापरला असा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हा आरोप आहे. कुलकर्णी यांनी विद्यापीठाचा पैसा वापरून स्वत: साठी 30 लाख रुपयांची गाडी घेतली, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तशी नोटीस देखील पाठवली आहे, असे मुंबई युनिव्हर्सिटी टीचर असोसिएशनने आपल्या पत्रात म्हटलेले आहे. मुंबई युनिव्हर्सिटी टीचर असोसिएशनने हे पत्र राज्यपालांकडे पाठवलेले आहे.

University Vice Chancellor
मुंबई विद्यापीठ कॉलेज टीचर असोसिएशनचे राज्यपालांना पत्र

आर्थिक गैरव्यवहार : पराग काळकर हे देखील पाच उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठांमध्ये वाणिज्य विभागामध्ये असताना आर्थिक गैरव्यवहार केला. त्याबाबत पुणे येथे त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल आहे. त्यांनी 2017 ते 18 या काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार केला होता. त्या संदर्भातील गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. हा पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधान कलम अंतर्गत 409 34, 406, 420 याशिवाय इतर गुन्हे दाखल आहे.

राज्यपालांकडे पत्र : यासंदर्भात मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर असोसिएशन संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी स्पष्टपणे आपल्या राज्यपालांना पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे की, कुलगुरू पद हे अत्यंत महत्त्वाचे प्रतिष्ठित आणि शिक्षण क्षेत्रामधील दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या निवड समितीने ज्या पाच उमेदवारांची निवड केली आहे. त्यामध्ये एकाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू आहे. तसेच दुसरे उमेदवार आहेत ज्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. या उमेदवारांची निवड समितीने कशी निश्चित केली, याबाबत आक्षेप घेत राज्यपालांना त्यांनी पत्र पाठवलेले आहे. मुंबई विद्यापीठाकडे याबाबत संपर्क करूनही त्यांच्याकडून कोणतेही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. परंतु सुभाष आठवले यांनी आज काही वेळापूर्वीच राज्यपालांकडे हे पत्र पाठवल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा :

  1. IIT Mumbai Student Suicide : आयआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप
  2. Bombay High Court: न्यायालयाचा परीक्षा आणि निकालाच्या नियोजन वेळापत्रकाबाबत हस्तक्षेप नसेल- मुंबई उच्च न्यायालय
  3. IAS Officer Molestation : महिला IAS अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी IRS अधिकाऱ्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.