ETV Bharat / state

राज्यात १८७ नविन कोरोनग्रस्तांची भर; एकूण रुग्णसंख्या १७६१ तर २०८ जणांना डिस्चार्ज - rajesh tope on corona update

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १७६१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २०८ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 11, 2020, 9:57 PM IST

मुंबई - राज्यात आज (11 एप्रिल) कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १७६१ वर गेली आहे. तसेच कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या राज्यात १४२६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १७६१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २०८ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यात ३८ हजार ८०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ४९६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४६४१ सर्वेक्षण पथके काम करत असून, त्यांनी 17 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

आज राज्यात १७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे १२ तर पुणे येथील २, सातारा, धुळे आणि मालेगाव येथील येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ६ महिला आहेत. तसेच १७ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर तिघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १७ पैकी १६ रुग्णांमध्ये (९४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग हा आजारही होता.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील -

मुंबई महानगरपालिका ११४६ (मृत्यू ७६)
ठाणे ०६
ठाणे मनपा २९ (मृत्यू ०३)
नवी मुंबई मनपा ३६ (मृत्यू ०२)
कल्याण डोंबवली मनपा ३५ (मृत्यू ०२)
उल्हासनगर मनपा ०१
भिवंडी निजामपूर मनपा ००
मीरा भाईंदर मनपा ३६ (मृत्यू ०१)
पालघर ०४ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा १४ (मृत्यू ०३)
रायगड ००
पनवेल मनपा ०७ (मृत्यू ०१)
ठाणे मंडळ एकूण १३१४ (मृत्यू ८९)
नाशिक ०२
नाशिक मनपा ०१
मालेगाव मनपा ११ (मृत्यू ०२)
अहमदनगर १०
अहमदनगर मनपा १६
धुळे ०१ (मृत्यू ०१)
धुळे मनपा ००
जळगाव ०१
जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१)
नंदूरबार ००
नाशिक मंडळ एकूण ४३ (मृत्यू ०४)
पुणे ०७
पुणे मनपा २२८ (मृत्यू २७)
पिंपरी चिंचवड मनपा २२
सोलापूर ००
सोलापूर मनपा ००
सातारा ०६ (मृत्यू ०२)
पुणे मंडळ एकूण २६३ (मृत्यू २९)
कोल्हापूर ०१
कोल्हापूर मनपा ०५
सांगली २६
सिंधुदुर्ग ०१
रत्नागिरी ०५ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मंडळ एकूण ३८ (मृत्यू ०१)
औरंगाबाद ०३
औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१)
जालना ०१
हिंगोली ०१
परभणी ००
परभणी मनपा ००
औरंगाबाद मंडळ एकूण २१ (मृत्यू ०१)
लातूर ००
लातूर मनपा ०८
उस्मानाबाद ०४
बीड ०१
नांदेड ००
नांदेड मनपा ००
लातूर मंडळ एकूण १३
अकोला ००
अकोला मनपा १२
अमरावती ००
अमरावती मनपा ०४ (मृत्यू ०१)
यवतमाळ ०४
बुलढाणा १३ (मृत्यू ०१)
वाशिम ०१
अकोला मंडळ एकूण ३४ (मृत्यू ०२)
नागपूर ००
नागपूर मनपा २५ (मृत्यू ०१)
वर्धा ००
भंडारा ००
गोंदिया ०१
चंद्रपूर ००
चंद्रपूर मनपा ००
गडचिरोली ००
नागपूर मंडळ एकूण २६ (मृत्यू ०१)
इतर राज्ये ०९
एकूण १७६१ (मृत्यू १२७)

कालपासून (शुक्रवार) डॉ. पी. के. सेन अतिरिक्त महासंचालक भारत सरकार यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय शीघ्र प्रतिसाद पथक हे पुणे येथे कोविड १९ प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेत आहे. या पथकामध्ये डॉ. सेन यांच्या सोबत डॉ. रोहित बन्सल, वैद्यकीय तज्ञ आणि डॉ सौरभ मित्रा भूल तज्ञ यांचाही समावेश आहे. या पथकाने मागील २ दिवसात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध तसेच वाय सी एम रुग्णालय, पिंपरी येथे भेट दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.