मुंबई-बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाची ( Actress Jiah Khan Suicide Case ) नव्याने चौकशी करण्यासाठी जियाची आई राबिया खान यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून ( Court rejects Rabia Khans plea ) लावली. आपला तपास यंत्रणेवर विश्वास असल्याचे खंडपीठाने आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे.
जिया खान आत्महत्या प्रकरण नवीन चौकशी याचिका 2013 मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने जियाच्या आत्महत्येचा तपास करत होती. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जियाचा प्रियकर म्हणून अभिनेता सुरज पांचोलीला अटकही केली होती. या नऊ वर्ष जुन्या प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा अशी मागणी करणारी याचिका जियाची आई राबिया खान हिने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करताना जियाची हत्या करण्यात आली होती असा दावा राबियाने केला ( Rabia Khans plea in Actress Jiah Khan Suicide Case ) होता. या प्रकरणाचा तपास प्रथम करत मुंबई पोलीस करत होते. त्यांच्या तपासात काही त्रुटी आणि चुकीचा दृष्टिकोन लक्षात आल्याने राबिया खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर जुलै 2014 मध्ये तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता असा युक्तिवाद अँड. शेखर जगताप आणि अँड. सायरुचिता चौधरी यांनी केला.
तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला असल्याचा दावा सीबीआयतर्फे अँड. संदेश पाटील यांनी केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत, अशी याचिका दाखल करून याचिकाकर्ता स्वतःचा खटला कमकुवत करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. राबियाची याचिका फेटाळून ( Court rejects Rabia Khans plea ) लावली.
काय आहे प्रकरण अभिनेत्री जिया खान हिचे निधन झाले, तेव्हा ती अवघी 25 वर्षांची होती. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले होता.
10 जून 2013 रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करण्याअंतर्गत खटला सुरू आहे.