मुंबई : पालघर येथील राहणारी आणि जे. जे. रुग्णालयातील डॉ. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी सुमारे पोलिसांनी जीवरक्षक मिथ्थु सिंग याला अटक केल्यानंतर आणखी एकाला अटक केली. अब्दुल जब्बार अन्सारी असे या आरोपीचे नाव असून या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपली असून न्यायालयाने त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपी मिथ्थु सिंगच्या नार्को टेस्टसाठी अर्ज केला होता. मात्र, आरोपी सिंग याने नार्कोसाठी लागणारी परवानगी असहमती दिल्याने न्यायालयाने नार्को टेस्टचा अर्ज फेटाळून लावला आहे, अशी माहिती वकील हर्षमन चौहान यांनी दिली आहे.
नार्को टेस्टसाठी नकार : दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षात शिकत होती. २९नोव्हेंबर २०२१ ला ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली ती परतलीच नाही. सदिच्छा हिचा शोध कुठेच लागत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. जे. जे. मध्ये परिक्षेस जाते म्हणून ती घराबाहेर पडल्याने जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविेण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅन्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलिस ठाण्यातही धाव घेतली होती. वकील हर्षमन चौहान यांनी सांगितले की, आज दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयासमोर आरोपी मिथू सिंग याला नार्को टेस्टबाबत त्याची सहमती विचारली असता त्याने नार्को टेस्टसाठी नकार दिला.
अब्दुलला अटक : गुन्हे शाखा युनिट ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी १०० पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिथ्थु सिंगने पाहिले होते. तिने मिथ्थु याच्यासोबत सेल्फी देखील काढला होता. पोलिसांनी मिथ्थु सिंगची चौकशी केली. मात्र, तो चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांना न्यायालयात त्याच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मिथ्थु विरोधात पुरावे गोळा केले. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. चौकशीमध्ये मिथ्थु याच्यासोबत सदिच्छा असताना त्याने अब्दुलशी संपर्क केला होता. दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली होती. यामध्ये दोघेही सदिच्छा हिच्याबाबत आक्षेपार्ह अश्लील बोलत असल्याचे तपासातून समोर आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी अब्दुल याला अटक केली.
हेही वाचा - Selfie With Cobra : कोब्रासोबत सेल्फी घेणे बेतले जीवावर, डंख मारल्याने तरुणाने गमावला जीव