मुंबई - खाजा युनिसच्या आईची मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. ख्वाजा युनूस कोठडीतील मृत्यू प्रकरणातील या चार पोलिसांना आरोपी बनवण्यासाठी खाजा युनूसच्या आईने अर्ज केला होता. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल भोसले, राजाराम होनमाने, हेमंत देसाई, अशोक खोत या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहेत. खाजा युनिसच्या आई आसिया बेगम यांनी सत्र न्यायालयाला त्यापुढील पुराव्याची दखल घेण्याचे तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी कलमानुसार 319 नुसार कारवाई करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने कडून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
युनूसला पोलिस बंदोबस्तात मारहाण - बडतर्फ कर्मचार्यांसह सचिन वाझे यांच्यासह चार माजी पोलिस अधिकार्यांवर खुनाच्या आरोपाखाली खटला चालवला जात आहे. स्वेच्छेने कबुलीजबाब देण्यासाठी गंभीर दुखापत करणे, पुरावे तयार करणे, गुन्हेगारी कट रचने या आरोपाखाली खटला सुरू आहे. एप्रिल 2018 मध्ये माजी सरकारी वकील धीरज मिरजकर यांनी निवृत्त पोलीस कर्मचारी प्रफुल्ल भोसलेकसह दलातील इतर तिघांविरुद्ध समन्स जारी करून त्यांना हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती.
सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द - मुख्य तक्रारदार साक्षीदार मोहम्मद अब्दुल मतीन यांनी भोसले, तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देसाई, इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी युनूसला पोलिस बंदोबस्तात मारहाण करताना पाहिले होते असा दावा करून कोर्टापुढे साक्ष दिल्यानंतर हा अर्ज दाखल करण्यात आला. त्याच महिन्याच्या शेवटी राज्य सरकारने या खटल्यात अधिवक्ता मिरजकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली होती.
काय आहे ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण? - 2 डिसेंबर 2002 रोजी मुंबईतील घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर 39 जण जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटा ही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.