मुंबई : शासन तक्रार ऐकत नाही म्हणून शासनाच्या एका संकेतस्थळावर तक्रार केल्यानंतरही दखल घेतली नाही. या कारणास्तव बच्चू कडू यांनी जनतेच्या काही समस्यांवर आंदोलन केले होते. याबाबत त्यांनी मंत्रालयामध्ये पुढील आंदोलन करू, असे म्हटले होते. मंत्रालयात ते आले त्यांनी त्यावेळेला आंदोलन देखील केले आणि शासनाला सवाल देखील केले होते. मात्र यामध्ये त्यांनी प्रशासनासोबत वाद घातल्याचा आरोप झाला आहे.
बच्चू कडू यांना दिलासा : सप्टेंबर 2018 रोजी एका पोर्टलला विरोध करत बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मंत्रालयात कार्यरत तत्कालीन संचालक प्रदीप जैन यांच्यासोबत त्यांनी बाचाबाची केली होती. त्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी कडू यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेच्या खटल्यात सध्या आरोप नक्की करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव 3 एप्रिल पर्यंत बच्चू कडू यांना दिलासा दिलेला आहे.
3 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल : बच्चू कडू यांच्यावर मंत्रालयातील त्या प्रकरणानंतर तक्रार दाखल झाली होती. त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला होता. परंतु त्यानंतर अनेकदा ते सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत. मध्यंतरी मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांचा अपघात झाला असल्यामुळे वैद्यकीय कारणांसाठी त्यांना न्यायालयाने हजर राहण्यापासून सूट दिली होती. त्यामुळे ते हजर राहू शकले नव्हते. मात्र आता ते आज यासंदर्भात सुनावणीसाठी हजर झाले होते. न्यायालयाने तांत्रिक कारणावरून तीन एप्रिल पर्यंत बच्चू कडू यांना दिलासा दिलेला आहे. आता 3 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल. त्यावेळेला त्यांच्या आरोप निश्चिती संदर्भात मुंबई सत्र न्यायालय निकाल देईल.
प्रशासनासोबत वाद : बच्चू कडू यांनी अपंगांच्या संदर्भात आणि आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेकदा आंदोलन केलेले आहे. या आंदोलनाच्या दरम्यान प्रशासनासोबत त्यांचे वाद देखील झालेले आहे. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर विविध ठिकाणी तक्रारी दाखल देखील केल्या आहेत. मात्र ही तक्रार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची आणि हाणामारी केल्या संदर्भातली असल्यामुळे याबाबत आरोप निश्चिती संदर्भात प्रक्रिया सुरू आहे त्याबाबतची ही सुनावणी मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये आज होती. 3 एप्रिल रोजी या संदर्भातले आरोप पत्र निश्चित केले जाईल. तोपर्यंत आमदार बच्चू कडू यांना दिलासा मिळालेला आहे. मात्र 3 एप्रिल रोजी सुनावणी सुरू झाल्यानंतर त्यास त्यासंदर्भात कारवाई होण्याची टांगती तलवार आहे हे देखील खरे आहे.
हेही वाचा : Thane ZP Corruption case : ठाणे जिल्हा परिषद सदस्यानेच भ्रष्टाचार आणला उघडकीस; प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात