ETV Bharat / state

Sanjay Raut News: संजय राऊत यांना न्यायालयाने ठोठावला एक हजार रूपयांचा दंड, 'हे' आहे कारण

मेधा सोमैय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी केल्यामुळे संजय राऊत यांना 1000 रुपयाचा दंड ठोठावला आहे. संजय राऊत यांना 1,000 रुपये भरणा करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

Sanjay Raut News
संजय राऊत
author img

By

Published : Mar 30, 2023, 6:35 AM IST

Updated : Mar 30, 2023, 7:17 AM IST

मुंबई : किरीट सोमैय्या यांच्या पत्नी मेधा सोमैय्या यांनी शौचालय बांधणीच्या बांधकामात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप खासदार राऊत यांनी केला. त्या संदर्भात मेधा सोमैय्या यांच्यावतीने मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता. संजय राऊत यांच्या वकिलांनी ही सुनावणी थोडी पुढे ढकलावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यासाठी संजय राऊत यांना मुंबई शिवडी न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. ए. मोकाशी यांनी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

एक हजार रुपयांचा दंड : हा मानहानीचा खटला दाखल झाल्यावर न्यायालयाने त्याबाबत संजय राऊत यांना नोटीस बजावली होती. अनेकदा संजय राऊत या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी गैरहजर देखील राहिले होते. त्यामुळे त्याबाबत न्यायालयाने नाराजी देखील व्यक्त केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी या मानहानी खटल्याबाबत सुनावणी पुढे ढकला, अशी विनंती न्यायालयाला केल्यावर न्यायालयाने उलट संजय राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप : संजय राऊत यांनी 12 एप्रिल 2022 रोजी सामना मुखपत्रामध्ये मोठा लेख लिहिला होता. किरीट सोमैय्या यांच्या पत्नी मेधा सोमैय्या यांनी मुंबईतील शौचालय बांधकामाच्या संदर्भात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आला होता. हा लेख सामना या मुखपत्रात ऑनलाइन स्वरूपात लिहिला गेला होता. या लेखामुळे मेधा सोमैय्या यांची बदनामी झाल्यामुळे त्यांनी मुंबई न्यायालयात याबाबत मानहानीचा खटला दाखल केला होता.

आर्थिक गैरव्यवहार केला : मानहानीच्या खटल्यामधील याचिकेत त्यांनी म्हटले होते की, ज्या प्रकारे त्यांनी सार्वजनिक रीतीने ऑनलाइन स्वरूपाचा लेख लिहिला. शंभर कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याबाबत निराधार आणि माझे बदनामी करण्यासाठी हे लिखाण केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मानहानी संदर्भात कारवाई केली जावी. तसेच संजय राऊत यांनी त्या त्यावेळच्या लिहिलेल्या ऑनलाइन लेखांमध्ये असा देखील आरोप केला होता की, मुंबईतील 16 शौचालय बांधणीचे कंत्राट मेधा सोमैय्या यांनी घेतले होते. त्यामध्ये त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला होता. ऑनलाइन लेखांमधील लिहिलेला मजकुर बदनामीकारक असल्याचे म्हणत मुंबई न्यायालयात मेधा सोमैय्या यांच्यावतीने मानहानीचा खटला दाखल झाला होता.

हेही वाचा : SC: सरकार कमकुवत आहे काय? धर्मांध भाषण करणारांवर कारवाई करा, सुप्रिम कोर्टाने फटकारले

Last Updated : Mar 30, 2023, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.