मुंबई - येथील एका वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या चौकशीच्या माध्यमातून ऑटो रिक्षात एका जोडप्याचे हरवलेले सोने परत मिळाले आहे. प्रदीप मोरे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
काय घडली घटना?
मालाडच्या मालवणी भागात राहणारे जोडपे मुंबईहून औरंगाबादच्या गावी एका लग्नासाठी जात होते. मात्र, ऑटो रिक्षात प्रवासादरम्यान चुकून आपली बॅग ऑटो रिक्षात विसरले व पुढे निघून गेले. दिंडोशीतील वेस्टन एक्सप्रेस महामार्गावर आपली बस पकडण्यासाठी ते एका रिक्षामध्ये बसले. त्यावेळेस त्यांच्यासोबत भरपूर साऱ्या बॅग होत्या. मात्र, उतरताना चुकून त्यांच्याकडून एक बॅग ते विसरले आणि रिक्षावालासुद्धा तिथून निघून गेला. ते जोडपे जेव्हा बसमध्ये बसले तेव्हा त्यांना समजले की आपल्या सार्या बॅगमधून एक बॅग कमी आहे व ती आपल्या रिक्षात राहिली आहे.
थोड्या लांब आल्यावर ते बसमधून पुन्हा उतरले आणि आपल्या बॅग शोधण्यासाठी त्या रिक्षावाल्याला शोधू लागले. शोधून शोधून जेव्हा ते थकले तेव्हा ऑटो रिक्षा वाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ते कुरार पोलीस स्थानकात गेले. दिंडोशी वाहतूक विभागातील प्रदीप मोरया नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने या प्रकरणाची चौकशी केली.
हेही वाचा - कोरोना नियमांचा भंग केल्याने जळगावात मंगल कार्यालयांना ठोकले टाळे
सीसीटीव्हीच्या आधारे जेव्हा ऑटोरिक्षाची चाचपणी केली तेव्हा त्या रिक्षाच्या मागे शिवाजी महाराजांचे पोस्टर लागलेले त्यांना कळाले. याच आधारावर त्यांनी रिक्षाचा शोध केला व ती बॅग हस्तगत केली, ज्यात सात लाख रुपये किमतीचे 13 तोळे सोने होते.
पोलिसांनी सांगितले, ऑटो रिक्षा ड्रायव्हरला सुद्धा त्या बागेमध्ये इतके दागिने असल्याचे माहिती नव्हते. या घटनेनंतर कॉन्स्टेबल प्रदीप मोरे यांच्या कौतुक सर्व स्तरातून होत आहे.