ETV Bharat / state

Corruption In BJP: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आणि विचारात - नाना पटोले - Corruption In BJP

राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडखोरी झाल्यानंतर (Corruption In BJP) महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचार हा भाजपच्या रक्तात आणि विचारात (Corruption In BJP thoughts) असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटी बैठकीनंतर पत्रकार परिषद ते बोलले. (Congress State President Nana Patole)

Corruption In BJP
नाना पटोले
author img

By

Published : Jul 6, 2023, 5:40 PM IST

मुंबई : ईडी आणि सीबीआय ही दुसऱ्याचे घर फोडण्यासाठी भाजपकडून (Corruption In BJP) आयुधे वापरली जातात. विरोधकांना भय दाखवून फोडण्याचं काम केलं जातं. भ्रष्टाचार तर भाजपच्या रक्तात भिनलेला डीएनए आहे, (Corruption In BJP thoughts) असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भ्रष्टाचार भाजपाच्या रक्तामध्ये आहे तसेच विचारांमध्ये आहे हे सिद्ध झालेले आहे. भ्रष्टाचारी लोक जमा करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा जो संकल्प भाजपने केलाय त्याला जनता धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे पटोले म्हणाले आहेत. (Congress State President Nana Patole)

काँग्रेसचे कोणीही भाजप सोबत जाणार नाही : सातत्याने काँग्रेसच्या विषयी वातावरण बिघडविण्याचे काम भाजपने केले. भाजपकडून वारंवार वक्तव्य केल्याचे की काँग्रेसचे अनेक लोक भाजप सोबत येणार आहेत. मात्र काँग्रेसकडून वारंवार सांगितले जात आहे की, काँग्रेसचे कोणीही भाजप सोबत जाणार नाही आणि ते आता खरे ठरले. भाजप अशा प्रकारची वातावरण निर्मिती जाणून-बुजून प्रयत्नपूर्वक करण्यात येते. कारण त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत. शेतकऱ्यावर दुबार पेरणी करायचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी बेरोजगारी अशा प्रश्नांना टाळण्यासाठी भाजप मुद्दामून बातम्या पसरवून मूळ मुद्द्याला बगल देत आहे. काँग्रेस याला बळी पडणार नाही. जनतेचे प्रश्न घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद होईल आंदोलने होतील. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

अपघातग्रस्त जळत असताना राजभवनात जयघोष : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता. त्यानंतर या दोन दिवसात जे घडलेले हे पाप, या प्रक्रियेला मी मुद्दामून पाप असा शब्दप्रयोग करतो. जे काय पाप करतात तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु एका बाजूला बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरील प्रवासी बस अपघातात मृत्यू झालेल्यांचे सरण जळत होते, दुसरीकडे राजभवनात जयघोष सुरू होता. भाजपने थोडी लाज ठेवायला हवी होती. राज्याच्या इतिहासात असे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले. ही भूमिका मी जनतेसमोर नेणार आहे.

भाजपला मुळापासून संपवायचे : महाविकास आघाडीत कोणत्या प्रकारे बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी आम्ही बैठक करत नाही. वारंवार काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक तसेच कोर कमिटीच्या बैठका सुरू आहेत. आज देखील आमची बैठक होती. भाजपला राज्यातून मुळापासून संपवायचे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन ही लढाई आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास असल्याचे नाना पटोले म्हणाले.

बाळासाहेब थोरातांचा दावा : राज्याचे विरोधी पक्ष नेते जरी सत्तेत सामील झाले असले तरी राज्यातील महाविकास आघाडी कायम आहे. आमची वज्रमुठ अधिकच भक्कम झाली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. CM Eknath Shinde Resignation : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले...
  2. MNS Shivsena Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेने टाळी दिल्याची चर्चा; मनसे नेते म्हणाले....
  3. Political Crisis In NCP : शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेली बैठक बेकायदेशीर, अजित पवारांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.