ETV Bharat / state

मुंबई झोपडपट्टीत कोरोना, आरोग्य विभागापुढे आवाहन - मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत सध्या वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, धारावी, कुर्ला, चुनाभट्टी, साकीनाका आदी परिसरातील झोपडपट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. झोपड्पट्टीत नागरिक दाटीवाटीने राहात असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागापुढे उभे राहिले आहे.

मुंबई झोपडपट्टीत कोरोना,  आरोग्य विभागापुढे आवाहन

author img

By

Published : Apr 8, 2020, 8:43 PM IST

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईमधील विशेष करून ६० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. मुंबईत सध्या वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, धारावी, कुर्ला, चुनाभट्टी, साकीनाका आदी परिसरातील झोपडपट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. झोपड्पट्टीत नागरिक दाटीवाटीने राहात असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागापुढे उभे राहिले आहे.

coronavirus spread in mumbai
मुंबई झोपडपट्टीत कोरोना, आरोग्य विभागापुढे आवाहन

मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यावर राज्य सरकारने जमावबंदी व नंतर कर्फ्यू लावला. केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे २४ तास धावणारी मुंबई कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठप्प झाली आहे. मुंबईमध्ये १ कोटी ३० लाख इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी ६० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा, घरामधून बाहेर पडू नका असे अनेकवेळा आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्याचे समोर आले आहे. तसेच ज्या लोकांना कोरणाची लागण झाली आहे त्यांनी समोर येऊन रुग्णालयाशी संपर्क साधा असे आवाहन केले असताना त्याकडेही लोकांनी दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाची लागण मुंबईत मोठया प्रमाणात होत आहे.

मुंबईत सर्वात जास्त रुग्ण जी साऊथ विभागातील वरळीच्या कोळीवाडा आणि जिजामाता नगर परिसरात आढळून आले आहेत. मुंबईमधील ६०० रुग्णांपैकी या विभागात तब्बल १३३ रुग्ण आहेत. त्या खालोखाल ई विभागातील भायखळा माझगाव रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर ४९ रुग्ण आढळून आले आहेत. डी विभागात असलेल्या डोंगरी विभागात ४७ तर के वेस्ट विभागातील अंधेरी वर्सोवा आदी विभागात ४३ रुग्ण आढळून आले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत १० रुग्ण आढळून आले आहेत. या ठिकाणी ३२५० क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

आयआयटी पवई मार्केट, कांदिवली, चेंबूर, कुर्ला, चुनाभट्टी, साकीनाका, दहिसर झोपडपट्टी, गोरेगाव बिंबीसार नगर, भाडुंप, कांजूरमार्ग, कुर्ला नेहरुनगर आदी परिसरात रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये झोपडपट्टी असलेल्या विभागात रुग्ण आढळून येत असल्याने विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. झोपडपट्टीत विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला तर रुग्णांची संख्या शेकडो आणि हजारोने वाढणार आहे. असे झाल्यास रुग्णांवर उपचाहर करणाऱ्या आरोग्य विभागावर ताण येणार आहे. यामुळे पालिकेने कोरोनाचे रुग्ण आढळून येत असलेले विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत.

मुंबईत सध्या अशी सुमारे २५० प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या विभागात पालिका स्वतःहून नागरिकांची तपासणी करत आहे. या तपासणीमध्ये अनेकांना कोरोनची लागण झुलायचे समोर येत आहे. झोपडपट्टी विभागात असे रुग्ण जात प्रमाणात समोर येऊ लागल्याने आरोग्य विभागापुढे आवाहन उभे राहिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.