ETV Bharat / state

पावसाळ्यात कोरोना विषाणूचा धोका सर्वाधिक- आयआयटीतील प्राध्यापकांचे निष्कर्ष - Rajnish Bharadwaj research corona

पावसाळ्यात उष्णता केवळ 10 टक्के असल्यामुळे कोरोना विषाणूचे थेंब अनेक तास जीवंत राहणार असल्याने ते साहजिकच पावसाच्या पाण्यातून अनेक नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याची भीती आयआयटीतील 2 प्राध्यापकांनी आपल्या अभ्यासातून व्यक्त केली आहे.

IIT mumbai, आयआयटी मुंबई
IIT mumbai
author img

By

Published : Jun 10, 2020, 8:08 PM IST

मुंबई - मागील काही महिन्यात देशात आणि राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका आता पावसाळ्यात असेल. आणि त्यामुळे येत्या काळात परिस्थिती गंभीर बनेल, असा इशारा आयआयटी मुंबईच्या एका संशोधनातून देण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतील प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल या 2 प्राध्यापकांनी हे संशोधन केले आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव हा पावसाळ्यात सर्वाधिक होऊ शकतो. कारण उन्हाळ्यात वातावरणात उष्णता असल्यामुळे कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकल्याने किंवा खोकल्ल्याने जे थेंब बाहेर पडतात ते उष्णतेमुळे लवकर सुकून जातात. मात्र, पावसाळ्यात उष्णता केवळ 10 टक्के असल्यामुळे कोरोना विषाणूचे थेंब अनेक तास जीवंत राहणार असल्याने ते साहजिकच पावसाच्या पाण्यातून अनेक नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याची भीती आयआयटीतील 2 प्राध्यापकांनी आपल्या अभ्यासातून व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर लॉकडाऊन उठवल्यामुळे मुंबई आणि विविध शहरांमध्ये लोकांची वर्दळ वाढताना दिसत आहे. त्यातच पुढे पावसाळ्यात कोरोनाच्या विषाणूचा फैलाव सर्वत्र होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढण्याची शक्यता अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकल्यानंतर किंवा खोकल्ल्यानंतर विषाणू थुंकी वाटे बाहेर पडतात. त्यामुळे थुंकीचे थेंब किती वेळ जिवंत राहू शकतात आणि थुंकी सुकण्यासाठी किती वेळ तसेच उष्णता लागते याचा अभ्यास केला. उष्णता कमी असणाऱ्या शहरातील कोरोना रोगाच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला असून उष्णता कमी असणाऱ्या शहरात कोरोना 5 पटीने जास्त झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये पावसाळ्यात कोरोनाचा प्रभाव अधिक वाढेल अशी भीती आयआयटी मुंबईमधील प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल या दोन प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी देशातील 6 शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढले आहेत.

मुंबईचे तापमान कमी झाल्यास धोका वाढेल

आता जून महिना चालू झाला असून वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. काही दिवसाने मुंबईमध्ये ऊन पूर्णपणे कमी होणार असल्यामुळे उष्णता 80 ते 90 टक्के कमी होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू नष्ट होणार नसून विविध ठिकाणी तो तसाच जिवंत राहणार असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

विषाणूचे थेंब सूकण्यासाठी लागतो वेळ

व्यक्तीला कोरोना झाल्यास त्या व्यक्तीला खोकला आणि शिंका येतात. व्यक्ती शिंकल्यानंतर शेकडो विषाणूंचे थेंब बाहेर पडतात. हे थेंब सुकून नष्ट होण्यासाठी मोठ्याप्रमाणात उष्णता लागते. मात्र आता पावसाळा सुरू होत असल्याने मुंबई आणि परिसरातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.