मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत काही प्रतिबंध लावण्यात आले. यानंतर रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्रानंतर काही ठिकाणी हे निर्बंध शिथिल करण्यात आले. अनलॉकच्या मुंबईत दुसऱ्या आठवड्यातही मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट आणखी घसरला आहे.
मुंबईत तिसऱ्या स्तराचे निर्बंध -
या आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट ३.७९ टक्के इतका होता. तर मागील आठवड्यात ४.४० टक्के तर त्याआधीच्या आठवड्यात ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. तर २ हजार ९६७ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लावण्यात आले आहेत. पालिका दुसऱ्या स्तराचे निर्बंध लावणार का? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर, वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ