ETV Bharat / state

कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर, १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. २ हजार ४६५ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : May 5, 2020, 7:46 AM IST

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. काल नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत केली आहे. यानुसार, राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर, १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७ , अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ९,३१० (३६१)

ठाणे: ६४ (२)
ठाणे मनपा: ५१४ (८)
नवी मुंबई मनपा: २५४ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)
मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)
पालघर: ४६ (१)
वसई विरार मनपा: १५८ (४)
रायगड: ४१ (१)
पनवेल मनपा: ६४ (२)
*ठाणे मंडळ एकूण: १०,८५७ (३९०)*

नाशिक: २१
नाशिक मनपा: ३१
मालेगाव मनपा: ३३० (१२)
अहमदनगर: ३५ (२)
अहमदनगर मनपा: ०७
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४६ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १८ (१)
*नाशिक मंडळ एकूण: ५३१ (३०)*

पुणे: १०२ (४)
पुणे मनपा: १७९६ (१०६)
पिंपरी चिंचवड मनपा: १२० (३)
सोलापूर: ३ (१)
सोलापूर मनपा: १२६ (६)
सातारा: ७९ (२)
*पुणे मंडळ एकूण: २२२६ (१२२)*

कोल्हापूर: ८
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: २ (१)
रत्नागिरी: १० (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ६० (३)*

औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३१० (१०)
जालना: ८
हिंगोली: ५२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १

*औरंगाबाद मंडळ एकूण: ३७५ (११)*

लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
*लातूर मंडळ एकूण: ५४ (३)*

अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ४८ (५)
अमरावती: १ (१)
अमरावती मनपा: ५७ (९)
यवतमाळ: ९१
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: २२९ (१७)*

नागपूर: २
नागपूर मनपा: १७२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: १८० (२)*

इतर राज्ये: २९ (५)
*एकूण: १४ हजार ५४१ (५८३)*

*(टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, कोविड-१९ पोर्टलवरील प्रयोगशाळांनी दिलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. हा अहवाल आयसीएमआर टेस्ट आयडी ११३९५४ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे , रायगड, व पालघर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांबाबत आयसीएमआर प्रयोगशाळेच्या एकूण आकडेवारीत वाढ झालेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या अहवालात बदल होऊ शकतो.)*

दरम्यान, आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी पुणे संचालक आरोग्य सेवा कार्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट दिली. राज्य पातळीवर करोना नियंत्रणाचे काम कशाप्रकारे सुरु आहे, याची माहिती घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.