ETV Bharat / state

'4 टी' मॉडेल, 'मिशन धारावी'ने दिला कोरोना मुक्तीचा मार्ग

अडीच किलोमीटर परिसरात धारावी झोपडपट्टी पसरली असून त्यात दहा लाखांहून अधिक लोक राहतात. 1 एप्रिल रोजी धारावीत पहिला रुग्ण आढळून आला होता. धारावीत आतापर्यंत 3700 रुग्ण आढळले असून सध्या धारावीत अवघे 10 सक्रिय रुग्ण आहेत. काल (शुक्रवारी) धारावीत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.

author img

By

Published : Dec 26, 2020, 6:21 PM IST

corona patients no reduced in dharavi due to mission dharavi and 4t model
'मिशन धारावी'ने दिला कोरोना मुक्तीचा मार्ग

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जगातील सर्वात मोठ्या धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार झाला. दाटीवाटीने घरे असलेल्या धारावीसह इतर झोपडपट्ट्या हॉटस्पॉट ठरल्या होत्या. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या 4 टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा 24 डिसेंबरला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या परिस्थितीवरुन धारावीसारख्या झोपडपट्टी भागाने जगाला कोरोना मुक्तीचा मार्ग दिला आहे.

झोपडपट्ट्या हॉटस्पॉट -

11 मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीच्या काळात इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. या इमारतींमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने काम करणारे कामगार, घरकाम करणाऱ्या बायका, सुरक्षारक्षक, ड्राइव्हर यांच्या माध्यमातून चाळी, झोपडपट्ट्यात कोरोनाचा प्रसार झाला. मुंबईतील धारावीसह वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, आदी विभागात झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनाच्या हॉटस्पॉट बनल्या होत्या.

धारावीत किती रुग्ण -

अडीच किलोमीटर परिसरात धारावी झोपडपट्टी पसरली असून त्यात दहा लाखांहून अधिक लोक राहतात. 1 एप्रिल रोजी धारावीत पहिला रुग्ण आढळून आला होता. धारावीत आतापर्यंत 3700 रुग्ण आढळले असून सध्या धारावीत अवघे 10 सक्रिय रुग्ण आहेत. काल (शुक्रवारी) धारावीत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. धारावीत सरासरी ऑगस्टमध्ये दिवसाला 6, सप्टेंबरमध्ये दिवसाला 12, ऑक्टोबरमध्ये दिवसाला 13, नोव्हेंबरमध्ये दिवसाला 5 तर डिसेंबरमध्ये दिवसाला 4 रुग्ण आढळून येत आहेत.

हेही वाचा - DECADES 2010-20 : दशकातील केंद्र सरकारची वादग्रस्त विधेयके व त्यावरून देशात झालेली आंदोलने

धारावीतच उपचार -

धारावीत 47500 घरांमधील 3.6 लाख नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. त्यापैकी 14970 लोकांची मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी करण्यात आली. 8246 जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. धारावीत एका 10 फुटाच्या घरात 8 ते 9 लोक राहत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यासाठी शाळा, सभागृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आली होती. धारावीमधील रुग्णांना धारावीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार करून त्यांना कोरोना व्हायरसमधून मुक्त करण्यात आले आहे.

...म्हणून आळा घालणे शक्य -

लहान घरे असल्याने धारावी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळणे कठीण काम होते. याठिकाणी स्थलांतरित कामगारांचाही प्रश्न होता. मात्र, आम्ही 'चेस द व्हायरस' ही योजना या ठिकाणी राबवली. धारावी सारख्या वस्तीत आम्ही खासगी डॉक्टरांना विनंती करून त्यांचे क्लिनिक सुरू केले. डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करण्याचे आवाहन केले. खासगी हॉस्पिटल ताब्यात घेतले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शाळा, हॉटेल याठिकाणी क्वारेंटाईन सेंटर सुरू केले. कम्युनिटी किचन सुरू करून नागरिकांना अन्नाचे वाटप केले. महापालिकेने स्वत: जाऊन नागरिकांची स्क्रिनिंग केली. त्यामधून समोर आलेल्या संशयित रुग्णांना सरकारी क्वारेंटाईन सेंटरमध्ये भरती करून त्यांना तिथेच सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण लवकर समोर आल्याने त्यांच्यावर त्वरित उपचार करता आले. यामुळे धारावीमधून कोरोनाच्या प्रसाराला आळा घालणे शक्य झाले, अशी माहिती पालिकेच्या जी-नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

देशभरात धारावी पॅटर्नची चर्चा -

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. धारावीमधील कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी पालिकेने ट्रेसिंग आणि क्वारेंटाईन करण्यावर भर दिला. फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले. आज धारावीतील रुग्ण संख्या कमी झाली आहे. झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. धारावीत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे धारावी पॅटर्नबाबत आज देशभरात चर्चा केली जात आहे. हेच धारावी पॅटर्न दिल्लीत राबण्याची चर्चा सुरू होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.