ETV Bharat / state

Corona Update : सावधान! मुंबईसह राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. अलीकडेच कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे.

Corona Update
कोरोना रूग्णसंख्या
author img

By

Published : Mar 6, 2023, 6:11 PM IST

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यापासून हा प्रसार कमी झाला. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे आता कोरोना पुन्हा पसरतो की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

रुग्णसंख्या वाढतेय : मुंबईमध्ये 27 फेब्रुवारीला 2, 28 फेब्रुवारीला 10, 1 मार्चला 8, 2 मार्चला 18, 3 मार्चला 11, 4 मार्चला 12, 5 मार्चला 13 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 27 फेब्रुवारीला 12, 28 फेब्रुवारीला 35, 1 मार्चला 32, 4 मार्चला 48, 5 मार्चला 46 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 10 च्या पुढे नोंद होत आहे. तर राज्यात सुमारे चार पटीने वाढली आहे.

सक्रिय रुग्णही दुप्पट : 27 फेब्रुवारीला मुंबईत 39, 28 फेब्रुवारीला 45, 1 मार्चला 47, 2 मार्चला 58, 3 मार्चला 64, 4 मार्चला 73, 5 मार्चला 74 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 27 फेब्रुवारीला 180, 28 फेब्रुवारीला 193, 1 मार्चला 198, 4 मार्चला 274, 5 मार्चला 285 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. 27 फेब्रुवारीच्या तुलनेत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे राज्यातही सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे.

असा पसरला कोरोना : मुंबईमध्ये 20 मार्च 2020 पासून 5 मार्च 2023 पर्यंत कोरोनाच्या 11 लाख 55 हजार 436 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 615 रुग्ण बरे झाले आहेत. तर 19 हजार 747 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 81 लाख 37 हजार 870 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 79 लाख 89 हजार 162 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 423 मृत्यू झाले आहेत.

काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही : मुंबईमध्ये कोरोना रुग्णांसाठी 4438 बेडस राखीव आहेत. त्यापैकी केवळ 1 बेडवर म्हणजेच 0.02 टक्के बेडवर रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असली तरी रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची आणि रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखी सध्या परिस्थिती नाही. मात्र रुग्णसंख्या वाढल्यास आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.

हेही वाचा: ICMR On Flu : कोविडनंतर देशभरात वाढत आहेत 'या' व्हायरसचे रुग्ण, आयसीएमआरने दिला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.