मुंबई - गेल्या वर्षाभरापासून कोरोनाने महाराष्ट्रासह जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना पहिल्या लाटेतून महाराष्ट्र सावरताना दिसत होता. यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आली. मात्र, निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका तरुणांनादेखील मोठ्या प्रमाणात बसला. जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असताना निर्बंध वेगवेगळ्या स्वरुपात शिथिल करण्यात आले. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
जुलैमध्ये आतापर्यंत दैनंदिन सरासरी सुमारे ८७००
जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये दररोज आठ ते दहा हजारांच्या दरम्यान नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील 12 दिवसांत रुग्णांची वाढ झाली आहे. तर मृत्युदरातही किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुसरी लाट कमी झाली असली तरी पूर्णपणे ओसरली नसल्याचेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसेच राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अजुनही पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या वर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
या जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक -
- मुंबई - ४९६
- रायगड - २६८
- अहमदनगर - ३१६
- पुणे - ४२०
- पुणे पालिका - २०७
- पिंपरी चिंचवड - २०४
- सोलापूर - ३२३
- सातारा - ५६९
- कोल्हापूर - १६४०
- कोल्हापूर पालिका - ३०७
- सांगली - ८५८
- रत्नागिरी - २८९
जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या -
- 12 जुलै - 7603 नवे रुग्ण
- 11 जुलै - 8535 नवे रुग्ण
- 10 जुलै - 8296 नवे रुग्ण
- 9 जुलै - 8992 नवे रुग्ण
- 7 जुलै - 9558 नवे रुग्ण
- 5 जुलै - 6740 नवे रुग्ण
- 4 जुलै - 9336 नवे रुग्ण
- 3 जुलै - 9489 नवे रुग्ण
- 2 जुलै - 8753 नवे रुग्ण
- 1 जुलै - 9195 नवे रुग्ण