ETV Bharat / state

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला... - कोरोना व्हायरस मुंबई बातमी

मुंबईत 13 जूनला कोरोनाचे 56585 रुग्ण होते. त्यात आठवडाभरात वाढ होऊन 64816 इतके रुग्ण 20 जूनला झाले. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 18 दिवस होता.

corona
कोरोना
author img

By

Published : Jun 22, 2020, 12:22 AM IST

मुंबई- मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र, यात एक दिलासादाय बातमी म्हणजे मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याचे पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 36 दिवस झाला आहे. तर खार येथील एच पूर्व विभागाचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 76 दिवसांवर गेला आहे. यामुळे काही प्रमाणात रुग्ण वाढ रोखण्यात पालिकेला यश आल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

मुंबईत 13 जूनला कोरोनाचे 56585 रुग्ण होते. त्यात आठवडाभरात वाढ होऊन 64816 इतके रुग्ण 20 जूनला झाले. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 18 दिवस होता. 10 जूनला हा कालावधी 25 दिवस झाला होता. रुग्ण वाढीचा सरासरी दर 1 जूनला 3.85 टक्के होता तर 10 जूनला 2.82 टक्के होता. 20 जूनला रुग्णवाढीचा दर 1.96 टक्के एवढा खाली घसरला आहे.

खार येथील पालिकेच्या एच पूर्व विभागाने रविवारी मोठी उडी घेतली असून त्यांचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 76 दिवसांवर पोहोचला आहे. या विभागात रुग्ण वाढीचा सरासरी दर फक्त 0.9 टक्के म्हणजेच सर्वात कमी आहे. भायखळा येथील ई विभागात हे प्रमाण 67 दिवस, दादर माटुंगा येथील एफ उत्तरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 65 दिवस, चेंबूर पूर्व येथील एम पूर्व विभागात 61 दिवस, कुर्ला येथील एल विभागात 60 दिवस इतका आहे. ई, एफ नॉर्थ, एम ईस्ट या तीन विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवसांपेक्षा जास्त आहे.

ए, जी साऊथ आणि बी या 3 विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षा जास्त आहे. फोर्ट कुलाबा येथील ए विभागात 57, एल्फिस्टन येथील जी साऊथ विभागात 51 दिवस आणि सॅन्डहर्स्ट रोड येथील बी विभागात 50 दिवस इतके दिवस रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे. तर जी नॉर्थ, एम वेस्ट आणि एन या तीन विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांपेक्षा जास्त आहे. दादर येथील जी नॉर्थ विभागात 48 दिवस, चेंबूर पश्चिम येथील एम वेस्ट विभागात 47 दिवस आणि घाटकोपरच्या एन विभागात 43 दिवस इतका रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी असल्याचे पालिकेच्या आकडेवारीत नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.