ETV Bharat / state

थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी - महाराष्ट्रातील घडामोडी

राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

all news from maharashtra
थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी
author img

By

Published : Jul 25, 2020, 1:54 PM IST

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

  • नाशिक - जिल्ह्यात मागील 24 तासांत 363 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. याबरोबतच दिवसभरात एकूण 349 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 38 हजार 869 संशयितांचे स्वब घेण्यात आले. त्यातील 11हजार 332 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 8 हजार 147 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 439 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी 1 हजार 549 नवे संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
  • नंदुरबार - जिल्ह्यात शुक्रवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी 11 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तर 13 जणांनी कोरोनावर मात केली. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता 439 वर पोहोचला आहे. तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 275 आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या चार शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीदरम्यान सर्वच व्यवहार बंद ठेवुन कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, शुक्रवारी सकाळच्या सुमारास रस्त्यांवर विनाकारण फिरणारे दिसुन आल्याने अनलॉकचे चित्र पहावयास मिळाले.
  • वसई (पालघर) - वसई-विरारमध्ये शुक्रवारी 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे एकूण बाधितांची संख्या 10 हजार 808 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला. तर तब्बल 102 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 221 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण 7 हजार 774 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 हजार 515 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
  • सांगली - जिल्ह्यात शुक्रवारी 166 बाधितांची नोंद करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील 117 जणांचा समावेश आहे. याबरोबच दोन जणांचा मृत्यू झाला. तर 31 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 450 वर पोहोचली आहे. यातील अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 693 इतकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
  • हिंगोली - जिल्ह्यात 22 जुलैला 54 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. यातील 47 रुग्ण हे रॅपिड टेस्टद्वारे आढळले होते. तर शुक्रवारी पुन्हा 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील 4 हे रॅपिड टेस्टद्वारे आढळले. तर 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यावरुन आता जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 533 वर पोहोचली आहे.
  • पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात 843 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तर 538 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 14 हजार 590 वर पोहोचली आहे. तसेच 3 हजार 289 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात गेल्या 10 दिवसांपासून कडक लॉकडाऊन लागू होते. मात्र, शुक्रवारपासून शहरातील सर्व अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा पुरवणारे दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • गडचिरोली - जिल्ह्यात गुरुवारी रात्री 28 तर शुक्रवारी 30 अशा एकूण 58 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण 235 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर शुक्रवारी 13 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 441 वर पोहोचली आहे. तर 205 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एसआरपीएफचे 43 जवान, सीआरपीएफचे 11 आणि 4 स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.
  • यवतमाळ - जिल्ह्यात शुक्रवारी 19 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाल्याने एकूण मृतांची संख्या 23 झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 234 झाली आहे. यात विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 159 तर रॅपीड अँटीजेन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 75 जण आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 689 झाली आहे. तर एकूण 451 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 66 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत 11 हजार 557 नमुने पाठविले आहेत. यापैकी 10 हजार 930 प्राप्त तर 627 अप्राप्त आहेत.
  • नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी 39 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 43 जणांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी एकूण 458 अहवालापैकी 391 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1 हजार 169 इतकी झाली आहे. एकूण 653 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 54 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 451 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे.
  • भंडारा - जिल्ह्यात शुक्रवारी पाच नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यात सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. तर शुक्रवारी 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या 215 झाली आहे. तर एकूण अक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 42 आहे. तर आतापर्यंत दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
  • कोल्हापूर - गुरुवारी रात्री 10 पासून शुक्रवार रात्री 10 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये तब्बल 358 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 11 बाधितांचा मृत्यू झाला. कलेत 70 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 3 हजार 665 झाली आहे. तर त्यातील 1 हजार 179 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 387 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.