मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत उतार (Corona Cases Decreased) होताना दिसून येत आहेत. आज (1 फेब्रुवारी) दिवसभरात 14 हजार 372 नवे रुग्ण (Today New Corona Cases in Maharashtra) आढळून आले आहेत. तर, 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.84 टक्के इतका आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण (No Omicron Cases Today) आढळून आला नाही.
हेही वाचा - Union Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये लोकल प्रवाशांच्या पदरी निराशाच; कोणतीही नवीन घोषणा नाही
- 1 लाख 91 हजार 524 सक्रिय रुग्ण -
आतापर्यंत 73 लाख 97 हजार 352 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बाधितांचे प्रमाण यामुळे 95.63 टक्के इतके आहे. तर 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10. 34 टक्के इतके म्हणजेच 77 लाख 35 हजार 481 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 69 हजार 596 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 273 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 1 लाख 91 हजार 524 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- ओमायक्रॉनचे शून्य रुग्ण-
राज्यात ओमायक्रॉनच्या एकही नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आजपर्यंत 3 हजार 221 एवढे ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात आहेत. तर 1689 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 6716 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले. त्यापैकी 6626 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 90 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
- खालील विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 803
ठाणे - 77
ठाणे मनपा - 200
नवी मुंबई पालिका - 329
कल्याण डोबिवली पालिका - 93
मीरा भाईंदर - 40
वसई विरार पालिका - 52
नाशिक - 555
नाशिक पालिका - 811
अहमदनगर - 782
अहमदनगर पालिका - 229
पुणे - 854
पुणे पालिका - 2091
पिंपरी चिंचवड पालिका - 1049
सातारा - 301
नागपूर मनपा - 1105
हेही वाचा - Restrictions relaxed in Mumbai : मुंबईतील निर्बंध शिथिल; नाईट कर्फ्यू हटवला... वाचा नवी नियमावली