ETV Bharat / state

COVID-19: शेती, मत्स्योत्पादन प्रभावित... शेतकरी, फळ विक्रेत्यांचे आर्थिक गणित कोलमडले

कोरोना व्हायरसमुळे शेती उद्योगही प्रभावित होत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फळभाज्या आणि फळे गोदामामध्ये पडून आहेत. यामुळे व्यापाऱ्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठा बंद पडल्या आहेत. शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरांमधील बाजारपेठा आणि आठवडी बाजारपेठा बंद पडत आहेत. त्यामुळे शेतकरी तसचे फळविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

corona-effect-on-fishing-fruit-vendors-farmer

author img

By

Published : Apr 10, 2020, 3:35 PM IST

Updated : Apr 10, 2020, 4:05 PM IST

मुंबई- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. कोरोना व्हायरसमुळे शेती उद्योगही प्रभावित होत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फळभाज्या आणि फळे गोदामामध्ये पडून आहेत. यामुळे व्यापाऱ्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठा बंद पडल्या आहेत. शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरांमधील बाजारपेठा आणि आठवडी बाजारपेठा बंद पडत आहेत. त्यामुळे शेतकरी तसचे फळविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुरुवातीला अवकाळी पाऊस त्यानंतर आता कोरोना व्हायरसमुळे फळ उत्पादकाचे मोठे नुकसान झाले आहे. फळे- भाजीपाला, हे पदार्थ नाशवंत असल्याने ते अधिक काळ साठवू शकत नाहीत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. आंबा निर्यातीवरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे आखाती देशांनी हापूस आंब्याची मागणी थांबवली आहे. यामुळे आंबा विक्रेत्यांची चिंता वाढली आहे.

आंबा काढणीसाठी मजूर मिळेना...

कोकणचा राजा म्हणून हापूसची ओळख आहे. त्यात या हापूसला जीआय मानंकनही मिळालं आहे. या हापूसची चव अगदी सातासमुद्रापार पोहचली आहे. दरवर्षी जवळपास 10 ते 12 हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात होत असते. पण यावर्षी आंब्याला आधी निसर्गाने ग्रहण लावलं. पाऊस लांबल्याने यावर्षी आंबा हंगामाला जवळपास एक महिना उशिरा सुरुवात झाली आहे. यावर्षी आंबा उत्पादन 50 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यात आता कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. आंबा वाहतुकिस परवानगी मिळाली आहे. मात्र, बाजारात आंबा नेऊनही आंब्याला गिऱ्हाईक नाही आणि दरही नाही. त्यात आंबा काढणीसाठी मजुरांचीही कमतरता आहे. त्यात हे नाशिवंत फळ. त्यामुळे झालेला खर्चही यावर्षी निघणे शक्य नाही.

corona-effect-on-fishing-fruit-vendors-farmer
आंबा काढणीसाठी मजूर मिळेना...

आंब्याला कोरोनाचे ग्रहण...

आंबा व्यवसायातून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये 2000 हजार कोटींची उलाढाल होत असते. या तीन जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर जवळपास 1200 कोटींचे कर्ज आहे. दरम्यान, सर्वाधिक आंबा उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यात होतं. दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात 1.25 ते 1.50 लाख मेट्रिक टन आंबा उत्पादन होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 78 हजार मेट्रिक टॅन आणि रायगड जिल्ह्यात 20 हजार मेट्रिक टन आंबा उत्पादन होते. पण यावर्षी मात्र उत्पादन 50 टक्के पेक्षा कमी आहे. त्यात कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकरी आणखी संकटात सापडला आहे. गेले 7 ते 8 महिने आंब्यावर खर्च करुन झाला आहे. आता फळ ज्यावेळी तयार होऊ लागले आहे. त्यावेळी मात्र कोरोनाचे ग्रहण लागले आहे. झालेला खर्चही निघण्याची शक्यता नाही.

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा फटका राज्यातल्या आंबा आणि मच्छिमारी व्यवसायाला देखील बसला आहे. शेकडो कोटींची आर्थिक उलाढाल या दोन व्यवसायांमधून होत असते. मात्र, सध्या हे दोन्ही व्यवसाय ठप्प आहेत. मच्छीमारी जवळपास पुर्णतः ठप्प आहे. तर आंबा तयार होत आहे. मात्र, शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी आहेत. आंबा काढणीसाठी मजुरांची कमतरता, त्यात आंबा काढून बाजारात नेला तरी त्याला गिऱ्हाईक नाही, निर्यात बंद अशी स्थिती आहे.
मासेमारी पूर्णतः ठप्प...
महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे शेतीबरोबरच मासेमारी हा किनारपट्टी भागातील एक प्रमुख व्यवसाय आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग बरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मासेमारी होते. लाखोंची उपजिविका मत्स्योत्पादनावर होत असते.

2018-19 मधील मत्स्योत्पादन-

रत्नागिरी - 73738 मेट्रिक टन
सिंधुदुर्ग - 19054 मेट्रिक टन
रायगड - 58847 मेट्रिक टन
ठाणे-पालघर - 99461 मेट्रिक टन

गेल्या काही वर्षांचा विचार केला तर मत्स्योत्पादनात घट होत असलेली पाहायला मिळत आहे. त्याची कारणं अनेक आहेत. मत्स्यपिल्लांची अनिर्बंध मासेमारी, अरबी समुद्रातील वादळे आणि समुद्रात घडलेल्या काही शास्त्रीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनात घट होत असते. निसर्गाच्या लहरीपणामुळेही अनेकवेळा मासेमारी ठप्प असते. त्यात आता कोरोनामुळे काही अपवाद वगळता मासेमारी पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे करोडोंची उलाढाल ठप्प झाली. याचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर हजारो जणांना बसला आहे. त्यामुळे यावर्षी कधी नव्हे एवढी घट मत्स्योत्पादनात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कोरोनामुळे आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय दोन्ही संकटात सापडले आहेत.

साडे तीन लाख मेट्रिक निर्यातक्षम द्राक्ष पडून...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉगडाऊन सह आंतरराष्ट्रीय हवाई सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे. याचा परिणाम सर्वाधिक नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. निर्यात बंद असल्याने नाशिक जिल्ह्यात तब्बल साडे तीन लाख मेट्रिक निर्यातक्षम द्राक्ष पडून आहेत. कोरोनामुळे यंदा 30 टक्केहुन अधिक द्राक्ष निर्यातीवर परिमाण झाला आहे. 60 ते 70 रुपये किलोची निर्यातक्षम द्राक्ष 18 ते 20 रुपयांनी रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच काही शेतकरी द्राक्षचे बेदाणे करत असून त्यातही त्यांना अडचणी येत असून बेदाणे बनवण्यासाठी लागणारे डिपिंग ऑइलचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष सातासमुद्रापार अनेक देशात दरवर्षी निर्यात होतात. शेतकरी हा प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटावर मात करुन गुणवत्तापूर्वक द्राक्षाचे उत्पादन घेतो. यावर्षी अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली खराब वातावरनात देखील शेतकऱ्यांनी अपार मेहनत करुन निर्यातक्षम द्राक्ष बागा वाचवल्या. मात्र, दुसरीकडे कोरोना सारख्या जागतिक महामारीने हवाई सेवेला देखील ब्रेक लावल्याने याचा मोठा फटका द्राक्ष निर्यातीला बसला आहे. चार एप्रिल पर्यंत वार्षिक नाशिक जिल्ह्यातून 1 लाख 9 हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. मात्र, कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात साडे तीन लाख मेट्रिक निर्यातक्षम

द्राक्ष पडून आहेत.

फळबाजारात शुकशुकाट....

कोरोनाचा फटका नागपुरातील फळ विक्रीला बसला आहे. शहरात महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समिती व संत्रा मार्केट हे प्रमुख फळ मार्केट आहेत. टाळेबंदीमुळे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी फळ मार्केटकडे पाठ फिरवली आहे. शिवाय मागणी कमी झाल्याने मालाची उचल मोठ्या प्रमाणात घटली आहे.

लाॅकडाऊनमुळे बागायतदारांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. मिळालेच मजूर तर त्यांना ज्यादा पैसे द्वावे लागत आहेत. शिवाय फळे बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्थेत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. माल वाहतुकीस कुठलाही निर्बंध नाही. मात्र, बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी गाडीवाले मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीने फळांच्या किमतीत चढ पहायला मिळतो आहे. वाढत्या किमतीमुळे बाजारात ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. शिवाय अनेक प्रकारच्या शंका-कुशंकामुळे ग्राहक फळ खरेदीस फारसे उत्सुक नाहीत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून फळांना थुंकी लावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काही ग्राहकांमध्ये फळ खरेदी करण्यावरून भीती पहायला मिळत आहे.

फळ विक्रेत्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एक विशिष्ट समाजाच्या फळ विक्रेत्यांपासून ग्राहकांनी अंतर राखणे पसंत केले आहे. त्यामुळे त्या समाजातील फळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने त्यांच्या समोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी..

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जग हादरुन गेले आहे. याचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात कर्फ्यू लागल्याने बाजार समित्या बंद आहे. त्यातच शेत मालाला उठाव नसल्याचे कारण सांगत व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील फळपीक उत्पादकांवर संकट कोसळले असून त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी होत आहे.

पारंपरिक पीक सोडून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळ शेतीचा निर्णय घेत टरबूज पिकांची मोठ्याप्रमाणात लागवड केली होती. त्यातून चार पैसे हातात येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात संचार बंदी केली असून अत्यावश्यक दुकाने सोडून बाकी सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, फळपीक उत्पादकांनी मेहनत करून उगवलेले पीक विकणे कठीन झाले आहे. जिल्ह्यातील बाजार समिती बंद आहे. उत्पादकांच्या मालाला उठाव नाही म्हणून व्यापारी माल घेण्यास नकार देत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता उत्पादित मालाचे करायचे काय ? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे ऊभा ठाकला आहे. या कठीन परिस्थितीत शासनाने काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

पोलीस शहरात येऊ देत नाहीत... काढणीला आलेले कलिंगड होतायेत खराब

सोलापूर जिल्ह्यात शेतात शेतमाल तयार आहे. मात्र, त्याची खरेदी करण्यासाठी कोणी व्यापारी येत नाही. बाजारही समितीही बंद आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथील शेतकरी संगप्‍पा यांनी दोन महिन्यापूर्वी अडीच एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली. मोठ्या कष्टाने कलिंगडाची जोपासना केली. बंकलगी सारख्या कायम दुष्काळी असलेल्या आणि पाण्याची वानवा असलेल्या भागांमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे कलिंगडाचे पीक घेतले. ते आता काढणीला आले आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे संगप्पा अडचणीत सापडले आहेत.

कलिंगड शेतातच खबाब होत आहेत...

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 14 एप्रिल पर्यंत लिलाव न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगड घेऊन जाता येत नाहीत. तर दुसरीकडे व्यापारी देखील कलिंगड घ्यायला तयार नाहीत. अशातच संगप्पा यांचे चिरंजीव यांनी स्वतःहून सोलापुरात कलिंगडाची विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलीस शहरात येऊ देत नाहीत.

अडीच एकर कलिंगडासाठी संगप्पा यांनी दीड लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्च बियाणी मल्चिंग पेपर, खत औषधं यावर झालेला आहे. त्यामध्ये मजुरांचा खर्च पकडलेला नाही. आता काढणीला आलेले कलिंगड शेतातच खराब व्हायला सुरुवात झाली आहे. किमान खर्च तरी निघेल या अपेक्षेने संगप्पा यांच्या कुटुंबातील मुले कलिंगड घेऊन सोलापूर शहरात येऊन विक्री करण्याचा विचारात आहेत. मात्र, पोलीस प्रशासन सोलापूर शहरात येऊ देत नाहीत.

शेतीमाल शहरात येऊ द्या, असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले असले तरीही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पोलिसांपर्यंत पोहोचले नसावेत. त्यामुळेच पोलीस काटेकोरपणे त्यांचे कर्तव्य बजावत असताना, सोलापूर शहरात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना देखील प्रवेश देत नसल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे.

व्यापारी शेताकडे फिरकत नाहीत, स्थानिक पातळीवर विक्री करणेही मुश्किल झाले...

पीक पद्धतीमध्ये बदल केल्यास चार पैसे पदरात पडतील, या आशेपोटी निलंगा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड केली. मात्र, आता पिकांच्या काढणीच्या प्रसंगी लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सर्वकाही ठप्प झाले आहे. कोरोना विषाणूच्या या संकटामुळे निलंग्यातील बापूराव बिराजदार आणि संभाजी बिराजदार या टरबुज उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने या शेतकऱ्यांच्या शेतात तयार असलेले लाखोंचे टरबुज शेतातच सडत आहे.

काढणीला आलेले कलिंगड होतायेत खराब

निलंगा तालुक्यातील तरुण शेतकरी बापूराव बिराजदार आणि संभाजी बिराजदार (रा. हाणमंतवाडी) या दोन्ही भावांनी आपल्या तीन एकर शेतीत दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून टरबुजाचे उत्पादन घेतले. औषध फवारणी, पाण्याचे नियोजन करून तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाची जोपासना केली. मात्र, ऐन पिक काढणीच्या प्रसंगी कोरोना विषाणूचे वादळ आले आणि देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे स्रव काही ठिक असूनही फक्त वाहतुकीची सोय नसल्याने आणि मालाची खरेदी करायला कोणी तयार नसल्याने लाखो रुपयांचे टरबुज फळपिक शेतातच पडुन आहे.

याबाबत बोलताना या तरुण शेतकऱ्यांनी, 'व्यापारी शेताकडे फिरकत नाहीत. स्थानिक पातळीवर विक्री करणेही मुश्किल झाले आहे. तयार असलेले हे फळ कोणीही घेऊन जात नाही' असे या बिराजदार बंधूंनी सांगितले आहे. या दोन्ही तरूण शेतकऱ्यांना सध्या शासनाच्या मदतीची गरज आहे.

Last Updated : Apr 10, 2020, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.